29 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeमनोरंजनश्रेयसची प्रकृती स्थिर; पत्नी दिप्तीच्या सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

श्रेयसची प्रकृती स्थिर; पत्नी दिप्तीच्या सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

काही दिवसांआधी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांच्या पायाखालची जमिन सरकली. दरम्यान, गुरूवारी श्रेयस तळपदे एका सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त होता. शूट संपल्यानंतर तो घरी गेला असता, त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला मुंबईच्या अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात आल्याने आता श्रेयसशी तब्येत उत्तम असल्याची माहिती श्रेयसची पत्नी दिप्ती तळपदे यांनी दिली आहे.

दिप्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सर्वांनी श्रेयसच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली असल्याने सर्वांचे तिनं आभार मानले आहे. सध्या श्रेयसची तब्येत स्थिर असून त्याला काही दिवसांमध्ये डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. श्रेयसला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील मेडिकल स्टाफ आणि टीमने घेतलेली काळजी तसेच वेळेत दिलेली ट्रिटमेंट आणि उत्तमरित्या घेतलेली काळजी महत्त्वाची ठरली असल्याचं म्हणत तिने रुग्णालयातील संपूर्ण मेडिकल टीमचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा

दिशा सालियन प्रकरणी शर्मिला ठाकरे उत्तरल्या

महेंद्र सिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी होणार निवृत्त

स्विगीहून खवय्याने ४२ लाखांचं मागवलं पार्सल

दिप्ती तळपदेची सोशल मीडिया पोस्ट

आता श्रेयस लवकरात लवकर रिकव्हर होत आहे. आमच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करण्याबाबत दिप्तीने विनंती केली आहे. सर्व चाहत्यांनी दिलेला पाठिंबा अशा काळात शक्तीशाली आहे. दिप्तीने केलेल्या या सोशल मीडियाच्या पोस्टवर चाहत्यांनी अभिनेत्याला लवकरात लवकर बरे होण्यााबाबत कमेंट करत सकारात्मक राहण्यास सांगितलं आहे. यामुळे दिप्तीला मानसिक आधार मिळण्यास मदत होत आहे.

श्रेयस तळपदेचं सध्या ४७ वय वर्षे आहे. तो वेलकम टू जंगल या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. त्यानंतर तो घरी आल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याच्या पत्नीने त्याला अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात आली. आता श्रेयसची तब्येत स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी