27 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeक्रीडामहेंद्र सिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी होणार निवृत्त

महेंद्र सिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी होणार निवृत्त

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियासाठी अनेक विश्वचषक तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. आपल्या कर्णधार पदाच्या कामगिरीवर धोनीने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या सामन्यांना विजयाच्या दाराशी नेऊन ठेवलं आहे. धोनीची कारगिर्द पाहता, आता बीसीसीआयने एक निर्णय घेतला आहे. धोनीची सात नंबरची जर्सी आता रिटायर होणार आहे. एखादा खेळाडू निवृत्त झालेला ऐकलं असेल, मात्र जर्सी निवृत्त होणं हे क्रिकेटमध्ये फारच कमी पाहायला मिळते. यापुढे कोणत्याही खेळाडूला ७ नंबरची जर्सी परिधान करता येणार नाही. धोनीच्या निवृत्तीनंतर तीन वर्षांनी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

धोनीची जर्सी रिटायर होणार असल्याचं वृत्त आता इंडियन एक्प्रसने दिलं आहे. यापूर्वी असा सन्मान केवळ सचिन तेंडुलकरला दिला होता. सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी रिटायर करण्यात आली होती. हा निर्णय बीसीसीआयने २०१७ मध्ये घेतला होता. अशातच आता धोनीची ७ क्रमांकाची जर्सी अन्य कोणत्याही खेळाडूला परिधान करता येणार नाही. धोनीनं भारताला दिलेल्या योगदानाच्या बदल्यात त्याची जर्सी निवृत्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा

स्विगीहून खवय्याने ४२ लाखांचं मागवलं पार्सल

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टीनं तब्येतीत सुधार

गौतमी पाटीलला हवंय मराठा आरक्षण

धोनीच्या नेतृत्वात यश

धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००७ साली टी-२० वर्ल्डकप जिंकला. २०११ सालात टीम इंडियाने वनडे वर्ल्डकपमध्ये विजय संपादन केले आहे. तर २०२३ या वर्षात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तर १५ ऑगस्ट २०२२ वर्षात धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

काय म्हणालं बीसीसीआय?

बीसीसीआयने पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना धोनीची ७ क्रमांकाची आणि सचिनची १० क्रमांकाची जर्सी घालू नये. दोघांच्या जर्सीवरील क्रमांकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रमांकाची जर्सी परिधान करावी अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी