27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयदिशा सालियन प्रकरणी शर्मिला ठाकरे उत्तरल्या

दिशा सालियन प्रकरणी शर्मिला ठाकरे उत्तरल्या

राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच आता मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे. दरम्यान आता आणखी एक मुद्दा उपस्थित केला जात आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha salian) मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंचं (aditya thckeray) नाव घेतलं गेलं आहे. मध्यंतरी भाजप नेते नारायण राणेंनी देखील आदित्य ठाकरेंचं सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियनबाबत कनेक्शन असल्याचं मोठं विधान केलं. पुन्हा आता आदित्य ठाकरेंवर दिशा सालियनप्रकरणी आरोप केले जात आहेत. यासाठी एक एसआयटी (SIT) स्थापना करण्यात आली आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी आदित्य असं काही करेल मला वाटत नाही, माध्यमांनी आदित्य ठाकरेंबाबत विचारलेल्या दिशा सालियन प्रकरणावर उत्तरल्या.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

अधिवेशनात दिशा सालियन हे प्रकरण सत्ताधारी पक्षांनी उचलून धरलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाकरे कुटुंबाला पुन्हा एकदा टार्गेट केलं जात असून आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. यावर आता शर्मिला ठाकरे उद्योग कर उद्योग या कार्यक्रमासाठी आल्या असता, त्यांना माध्यमांनी दिशा सलियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी होत आहे. असं विचारलं असता, शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, आदित्य असं काही करेल हे मला तरी वाटत नाही. आरोप कोणावरही होतात. आम्हीही त्यातूनच आलो आहे, असं म्हणत शर्मिला ठाकरे उत्तरल्या.

हे ही वाचा

महेंद्र सिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी होणार निवृत्त

स्विगीहून खवय्याने ४२ लाखांचं मागवलं पार्सल

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टीनं तब्येतीत सुधार

काय आहे नेमकं प्रकरण? 

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हा १४ जून २०२० रोजी झाला आहे. यानंतर सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सलियानचा मुंबई मालाडमध्ये मृत्यू झाला. सुशांत सिंह राजपूतनंतर दिशा सालियनच्या मृत्यूने भाजपने आदित्य ठाकरेंवर एसआयटी चौकशी होणार असल्याचं सांगितलं आहे. काहींच्या मते दिशाने आत्महत्या केली तर काहींच्या मते दिशाचा खून झाला. या मुद्द्याला धरत आदित्य ठाकरेंना आरोपाच्या जाळ्यात अडकवलं जात आहे. यासाठी आता आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी