34 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeक्रिकेटऋषभ पंतसाठी एका वर्षांआधी आजचा दिवस ठरला दैवबलवत्तर

ऋषभ पंतसाठी एका वर्षांआधी आजचा दिवस ठरला दैवबलवत्तर

आजच्या दिवशी बरोबर एक वर्षांआधी ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) धक्कादायक प्रकार घडला होता. पंतच्या जीवचं बरं वाईट व्हायला फार क्षणाचाही विलंब लागला नसता. होत्याचं नव्हतं झालं असतं. दिल्लीहून रूरकीकडे जात असताना भारताचा फलंदाज ऋषभ पंतचा आजच्या दिवशी २०२२ वर्षात अपघात झाला होता. या घटनेनं क्रिकेट चाहत्यांच्या पायाखालील जमीन सरकली होती. ऋषभ पंतच्या मर्सडीज गाडीने पेट घेतला होता. यामुळे आता अशा स्थितीत ती गाडी आणि गाडीमधील वाहन चालक वाचेल का? असा मोठा प्रश्न होता. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहिल्यास पंत रक्ताच्या थारोळ्यात होता त्याचं जगणं मुश्किल झाल्याचं दिसत होतं. तो मरणाच्या दारात टेकला होता. मात्र अशावेळी पंतला वाचवण्यासाठी ड्रायव्हरसारखा देवमाणूस मदतीला आला.

ट्रक ड्रायव्हरचं देवपण

ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी एक ट्रक ड्रायव्हर आला होता. त्याचं नाव सुशिल असून त्याने ऋषभ पंतचा जीव वाचवला आहे. पेटत्या गाडीमध्ये पंत होता. यावेळी सुशिलने ऋषभ पंतला त्या गाडीतून बाहेर काढलं आहे. यामुळे ऋषभ पंत वाचला. मात्र त्याच्या जीवनामध्ये काही बदल झाले आहेत. काही काळ त्याच्यासाठी जगणं असहाय होऊन बसलं होतं. त्याला चालता येत नव्हतं. तो आपल्या करिअरपासून लांब गेला होता. यामुळे त्याला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे.

हे ही वाचा

‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात थ्री इडियट्समधील चतुरचं पदार्पण

मुंबई महानगरपालिका १००० किमी रस्ते धुतले जाणार

मुस्लिम मुलीची श्रीरामाच्या जयघोषात दर्शनासाठी पायी आयोध्यावारी

सुरूवातीला त्याला हरिद्वारच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यावर काही काळ उपचार करत देहराडूनला दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या घुडघ्याला लिंगामेंट टिअर झाल्याची माहिती समोर आली. यानंतर पंतला मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात दाखल केलं आहे. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या घुडघ्याची शस्त्रक्रीया केली. सध्या पंतची तब्येत स्थिर आहे. मात्र असं असलं तरीही काही काळ तो विश्रांती करत आहे.

घुडघेदुखी म्हणजे क्रिकेटरच्या अवघड जागेचं दुखणं

घुडघ्याला होणारा त्रास हा क्रिकेटरच्या अवघड जागेचं दुखणं असल्याचं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. क्रिकेटरचे घुडघे चांगले असतील तर खेळाडू कोणत्याही स्थितीत चांगली कामगिरी करतो. धावणे हा क्रिकेटचा गाभा आहे. कारण क्रिकेटमध्ये धावण्याची कृती केल्याशिवाय काहीच होत नाही. सध्या पंत आपली काळजी घेत आहे. वेळोवेळी आपल्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर माहिती देत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी