29 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeमनोरंजन'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटात थ्री इडियट्समधील चतुरचं पदार्पण

‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात थ्री इडियट्समधील चतुरचं पदार्पण

मराठी सिनेमांना सध्या प्रचंड प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत. मराठी सिनेमा आता केवळ महाराष्ट्रापर्यंत मर्यादीत राहिला नसून त्याचा डंका साता समुद्रापलिकडे वाजत आहे. अशातच आता आणखी एका मराठी सिनेमाची सर्वाधित चर्चा आहे. आईच्या गावात मराठीत बोल असं त्या मराठी चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांनी सर्वाधिक प्रसिद्धी दिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला असून ट्रेलर पाहूणच प्रेक्षक पोट धरून हसत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटामध्ये ओमी वैद्य याची भूमिका असणार आहे. त्याने थ्री इडियट्स या चित्रपटामध्ये देखील काम केलं होतं.

थ्री इडियट्स या चित्रपटामध्ये ओमी वैद्य याने अप्रतिम भूमिका केली होती. सर्वच प्रेक्षकांनी चतुरचं कॅरेक्टर आवडलं होतं. यामुळे चित्रपटामधील विनोदाला जीव निर्माण आल्याचं चित्रपट पाहिल्यानंतर समजलं आहे. यानंतर आता हाच विनोदी प्रयोग ओमी वैद्यला मराठीमध्ये प्रयोग करायचा असल्याचं दिसत आहे. आता चतुर म्हणजेच वैद्य आता मराठी बोलणार आहे. विचार केला तरी हसू येत असल्याच्या भावना प्रेक्षक करतील अशा चर्चा आहेत. मराठी चित्रपटामध्ये ओमीचं हे पदार्पण आहे. यामुळे आता या चित्रपटाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा

मुंबई महानगरपालिका १००० किमी रस्ते धुतले जाणार

मुस्लिम मुलीची श्रीरामाच्या जयघोषात दर्शनासाठी पायी आयोध्यावारी

गौतम अदाणी आणि शरद पवार यांची भेट, चर्चेला उधाण

ओमी वैद्य चित्रपटाचा दिग्दर्शक

या चित्रपटाचे दिग्दर्शन हे ओमी वैद्य यांनी केलं आहे. तर पटकथा, कथा आणि संवाद हे ओमी आणि अमृता हर्डीकर यांनी लिहिले आहेत. तर कॅमेऱ्याची धुरा ही योगेश कोळी यांनी सांभाळली आहे. तर संकलन हे मयुर हरदास आणि ओमी वैद्य यांनी संकलन केलं आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर तांत्रिक बाबी, दिग्दर्शन अप्रतिम दिसत असल्याचं जाणवतं.

संस्कृती बालगुडे आणि पार्थ भालेराव मुख्य भूमिकेत

सिनेमाच्या पोस्टरमध्ये पाहिलं तर संस्कृती बालगुडे आणि पार्थ भालेराव मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहेत. मात्र त्यासोबतच आता सायली राजाध्यक्ष आणि सुधीर जोगळेकर,अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर यांचा देखील चित्रपटामध्ये समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी