28 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeक्रिकेटरोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेताच चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात

रोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेताच चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात

आयपीएलला काही महिने बाकी आहेत. त्याची पूर्वतयारी आतापासून सुरू आहे. आगामी आयपीएलच्या हंगामातील मोठे अपडेट आता समोर येऊ लागले आहेत. शुक्रवारी मुंबई इंडियन्सने १० वर्षे कर्णधारपद भूषवलेल्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले आणि त्याची जागा आता हार्दिकपांड्याला देण्यात आली आहे. हार्दिक पांड्या हा गुजरातचा कर्णधार होता. पांड्याने गुजरातला गतवर्षी गुजरातला विजयाच्या शिखरवर नेऊन ठेवलं आहे. आता ही त्याला मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिली आहे. यावरून आता रोहित शर्माच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्स संचालकांवर बोट केलं आहे. यावरून आता आयपीएलमध्ये कंन्ट्रोव्हर्सी तयार होऊ लागली आहे.

काही दिवसांपूर्वी पांड्याला गुजरातमधून मुंबईमध्ये ट्रेड करण्यात आलं होतं. यासाठी पांड्याला ७.५० कोटी आणि गुजरातला ५.५० कोटी असे १५ कोटी देण्यात आले असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावेली हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णाधार होणार अशा चर्चा होत्या आणि तेच झालं आहे. या निर्णयामागे नेमकं कोणतं कारण आहे. याबाबत अजून माहिती समोर आली नाही.

हे ही वाचा

संसदेत झालेल्या हल्ल्याचा संदर्भ थेट कल्याणपर्यंत

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर हार्दिक पांड्याचा शिक्कामोर्तब

श्रेयसची प्रकृती स्थिर; पत्नी दिप्तीच्या सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

दरम्यान रोहित शर्माने २०१३ ला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. एकूण १० वर्षे रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा सांभाळ केला आहे. मात्र मुंबई संघाच्या संचालकाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हार्दिक पांड्या नवखा कर्णधार असल्याची पोस्ट शेअर करत पांड्याच्या कर्णधारपदावर शिक्कामोर्तब केला आहे. अशातच आता रोहित शर्माने २०१३ ते २०२२ या वर्षांमध्ये आयपीएलमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल पाच वेळा रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाला विजयाच्या शिखरावर नेऊन ठेवलं होतं. मात्र रोहितला कर्णधारपदावरून हटवल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटला लाखो चाहत्यांनी अनफॉलो केलं आहे.

रोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेताच चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात

मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया पेजला फॉलोअर्सचा फटका

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी निवड केल्याने प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. यानंतर काहीक वेळेत मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून लाखो चाहत्यांनी संघाच्या इंस्टाग्राम आयडीला अनफॉलो केलं आहे. हीच परिस्थिती ट्विटरची पाहायला मिळत आहे.

रोहित शर्माच्या चाहत्यांचा संताप

दरम्यान, रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं? असा सवाल आता चाहत्यांनी केला आहे. हार्दिक पांड्याला कर्णधारपद पेलणार नसल्याचं देखील चाहते म्हणाले आहेत. हार्दिक पांड्याला दिलेल्या या कर्णधापदाच्या संधीवर चाहत्यांनी नाराजी आणि रोष व्यक्त करत मुंबई इंडियन्स संघाच्या संचालकांना धारेवर धरलं आहे. तसेच पांड्याचं कर्णधारपद काढून घेण्याबाबत अनेक चाहत्यांनी मागणी करत संताप व्यक्त केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी