24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीयडॉ. प्रशांत इंगळे बसपाचे मुंबई कोकण झोन प्रभारीपदी नियुक्त

डॉ. प्रशांत इंगळे बसपाचे मुंबई कोकण झोन प्रभारीपदी नियुक्त

आगामी निवडणुका लक्षात घेता राज्यातील सर्वच पक्ष पूर्वतयारी करत आहे. कोणी सभा घेत आहे तर कोणी आपापल्या पक्षांमध्ये आगामी निवडणुकांबाबत विचारविनिमय करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा बहन मायावती जी यांच्या अध्यक्षपदाखाली लखनऊ येथे झालेल्या बैठकित कार्यकारणी, पदाधीकारी, कार्यकर्त्यांची मोठी बैठक पार पडली आहे. या बैठकित आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवर चर्चा केली. अशातच केंद्रातून खासदार रामजी गौतम यांना राष्ट्रीय कॉर्डिनेटर आणि नितीन सिंग यांना दुसरे कॉर्डिनेटर म्हणून महाराष्ट्र राज्यावर नेमणूक करण्यात आली. राज्यात काही बदल करण्यास आल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याच्या पातळीवर विचार केला तर अॅड. परमेश्वर गोणोरे यांना राज्याचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून या एका नवीन पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र महासचिव व मुंबई प्रभारी सचिव म्हणून डॉ. इंगळेंची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याची संपूर्ण कार्यकारणी नव्याने बनवण्यात आली आहे.

हे ही वाचा

रोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेताच चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात

संसदेत झालेल्या हल्ल्याचा संदर्भ थेट कल्याणपर्यंत

दिशा सालियन प्रकरणी शर्मिला ठाकरे उत्तरल्या

महाराष्ट्र उपाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि विदर्भ प्रभारी अॅड. सुनील डोंगरे महाराष्ट्र महासचिव व मराठवाडा झोन प्रभारी मनीष भाई कावळे तसेच महाराष्ट्र महासचिव व पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी डॉक्टर हुलगेश चलवादी यांना पुढे अतिशय महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचं घोषित केले आहे. यानंतर डॉ. प्रशांत इंगळे यांना दिलेल्या पदावर त्या आनंदी असून बहन मायावतींचे आभार मानले आहेत.

निवडणुकीला निकाल देण्याइतपत काम करेल

मुंबई कोकण झोनमध्ये संघटनात्मक बांधणी करून लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीला निकाल देण्याइतपत काम निश्चित करेल. बहन कुमारीजींनी माझ्यावर विश्वास ठेवत माझ्या सारख्या सर्वसामान्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल मी बहन कुमारी मायावतींचे आभार मानतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी