28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रिकेटटीम इंडियाकडून विजयाची 'आठवी माळ', पाकिस्तानचा दणदणीत पराभव

टीम इंडियाकडून विजयाची ‘आठवी माळ’, पाकिस्तानचा दणदणीत पराभव

टीम इंडियाने भीम पराक्रम केला आहे. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सलग आठव्यांदा पाकिस्तानला हरवून घटस्थापनेच्या एक दिवस आधीच विजयाची आठवी माळ रुजवली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा ७ विकेटने दणदणीत पराभव केला आहे. १९.३ षटके शिल्लक असतानाच भारताने विजय मिळवला. हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी देश-विदेशातून क्रिकेटप्रेमी अहमदाबादमध्ये आले होते. त्या सर्वांचे येणे सार्थकी लागल्याने विजयाचा मोठा जल्लोष होत आहे. या विजयासोबत टीम इंडियाने या वर्ल्डकपमधील विजयाची हॅट्रिक केली आहे तर पाकिस्तानची विजयाची मालिका खंडित केली आहे. गेल्या महिन्यात टीम इंडियाने श्रीलंकेत झालेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप जिंकला होता. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे यावेळी दोन्ही टीम तगड्या असून टीम इंडियाने पाकिस्तानी संघाला अक्षरश: लोळवले. आजच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पटकावलेल्या ८६ धावांमुळे प्रेक्षक खुश झाले.

खेळ कुठलाही असो भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमने-सामने आले की चुरस वाढतेच. त्यातही क्रिकेटचा सामना असला की विचारायची सोय नाही. त्यावेळी मैदानाला युद्धभूमीचे स्वरुप प्राप्त होते. आजचा दिवसही तसाच उत्कंठावर्धक होता. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बाबर आझमच्या संघाला प्रथम फलंदाजीची संधी दिली. आणि पाकिस्तानी संघाला केवळ ४२.५ षटकांत गुंडाळण्यात टीम इंडियाला यश आले. पाकिस्तानचा संघ केवळ १९१ धावा करू शकला. त्यात कर्णधार बाबर आझमची अर्धशतकी खेळी (५८ बॉल), मोहम्मद रिझवानच्या ४९ धावा (६९ बॉल) आणि इमाम अल-हकच्या ३६ धावा (३८ बॉल) महत्त्वाच्या ठरल्या. तर भारताच्या गोलंदाजांनी इतर फलंदाजांना एक अंकी धावसंख्येत तंबूत पाठवण्याची किमया साधली.

हे ही वाचा

कुछ कुछ होता है फक्त २५ रुपयात!

आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश

गाझामध्ये वीज, पाण्याशिवाय कसे जगतात लोक?

टीम इंडियाने फलंदाजीची सुरुवातच खणखणीत केली. अवघ्या दोन षटकांत २२ धावा केल्या होत्या. डेंग्यूवर मात केलेल्या शुभमन गिलने ११ बॉलमध्ये १६ धावा केल्या. तो जम बसवत असतानाच शाहीन आफ्रिदीने त्याची विकेट घेतली. तर हसन अली याने १६ धावांतच विराट कोहलीला तंबूत पाठवला. मात्र रोहित शर्माची तडाखेबाज फलंदाजी आणि त्याला श्रेयस अय्यरने दिलेली सुंदर साथ यामुळे टीम इंडियाने पाकिस्तानाला चारी मुंड्या चीत करण्यात यश मिळवले. विजय जवळ असतानाच ६३ बॉलमध्ये ८६ धावा चोपणाऱ्या रोहित शर्माला बाद करण्यात शाहीन आफ्रिदीला यश आले. त्यानंतर के.एल.राहुल आणि ६२ बॉलमध्ये ५३ धावा काढणाऱ्या श्रेयस अय्यर या जोडीने टीम इंडियाच्या विजयावर मोहोर उमटवली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी