27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeक्रिकेट500 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये 'हे' भारतीय फलंदाज टॉप फाईव्ह

500 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ‘हे’ भारतीय फलंदाज टॉप फाईव्ह

देशात आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप (ICC Worldcup) अंतिम टप्प्यात आला आहे. या वर्ल्डकपची चर्चा देशभर होत आहे. अनेक कारणांसाठी या वर्ल्डकपला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या सर्वच संघातील खेळाडूंनी अफलातून कामगिरी करत नवनवीन रेकॉर्ड्सवर आपले नाव कोरले आहे. विराट कोहलीचे (Virat kohli) 49 वे शतक, मॅक्सवेलचे द्विशतक, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) वर्ल्डकपमधील अधिकाधिक षटकार. यामुळे हा वर्ल्डकप जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी डोक्यावर घेतला आहे. याचप्रमाणे 2007 पासून ते 2023 पर्यंत 500 धावा करणाऱ्या टॉप फाईव्हमध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, आणि टीम इंडियाचा समावेश आहे.

देशात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीच्या 49 व्या शतकाची अधिक चर्चा होती. मात्र त्याने 49 वे शतक पूर्ण करून आपले नाव क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसोबत जोडले आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाच्या मॅक्सवेलने प्रतिकूल परिस्थितीत, दुखापतग्रस्त स्वरूपात असताना खणखणीत द्विशतकी खेळी केली आहे. रोहित शर्माने सर्वाधिक षटकार मारल्याचा विक्रम केला आहे. मात्र याच टॉप फाईव्हमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा समावेश आहे.

2007 ते 2023 वर्षात वनडे विश्वचषकात 500 धावा करणारे फलंदाज कोण?

2007 ते 2023 या वनडे क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अनेक रेकॉर्ड्स झाले आहेत. काही रेकॉर्ड्स काही चाहत्यांना माहितही नसतील. 2007 मध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी 500 हून अधिक धावा केल्या होत्या. यामध्ये श्रीलंकेचा महेला जयवर्धने याचा समावेश होतो. तर ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू रिकी पाँटिंगनेही 500 हून अधिक धावा केल्या आहेत. तर 2019 या वनडे वर्ल्डकपमध्ये केन विलियम्सनने सर्वाधिक 500 हून अधिक धावा केल्या तर याच वर्षात ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच याने देखील 500 हून अधिक धावा केल्या आहेत. 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची 500 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या टॉप फाईव्हमध्ये गणना केली जात आहे.

हे ही वाचा

‘देवी’च्या जन्मानंतर बिपाशा बासूचं काय झालं पाहा?

शरद पवार लवकरच सरकारमध्ये; रवी राणांचं स्फोटक विधान

बुलढाणा लोकसभेवर शिवसेनेचा दावा, संजय गायकवाडांचे थेट भाजपला आव्हान

500 धावा करणाऱ्या खेळाडूंची धावसंख्या

2007 – रिकी पाँटिंग – 553 धावा.

महेला जयवर्धने – 548 धावा.

2019 – केन विलियम्सनने – 578 धावा.

आरोन फिंच – 507 धावा.

2023 – रोहित शर्मा – 503 धावा.

विराट कोहली – 594

क्विंटन डी कॉक- 591

रचीन रवींद्र – 564

डेव्हिड वॉर्नर – 499

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी