31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्रिकेटविराट कोहली टी २० खेळणार का?

विराट कोहली टी २० खेळणार का?

आयसीसी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली होती. आकरापैकी दहा सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. त्यानंतर मात्र अंतिम सामन्यात नको तेच झालं. टीम इंडियाचा पराभव झाला. यावेळी खेळाडूंसह देशातील क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर झाले. तर विराट कोहलीसह इतर टीम इंडिया खेळाडूंच्या डोळ्यात पाणी होते. यावर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली आगामी मालिका, चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि टी २० सामने खेळणार का? असे प्रश्न आता क्रिकेट चाहत्यांना पडले आहेत.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन खेळाडू टीम इंडियाचे भक्कम खेळाडू आहेत. या दोघांनीही वनडे वर्ल्डकपमध्ये जबरदस्त खेळी केली असून कोहलीने भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा रेकॉर्ड मोडित काढला आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक षटकार मारले आहेत. मात्र आता हे दोन्ही खेळाडू आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळणार का? असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं वय हे इतर खेळाडूंपेक्षा अधिक असल्याने आगामी सामने आणि वर्ल्डकप खेळणार की नाही यावरून चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा

‘नालायक’ शब्दावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा

सारा तेंडुलकरचे शिक्षण किती? सोशल मीडियावर पोस्ट करत केला खुलासा

महिलांसाठी ‘पिंक रिक्षा’ ‘या’ शहरात होणार सुरू

घडामोडी पाहता आणि अंदाज बांधता चाहते नाराज होऊ शकतात. सध्या ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाच्या टी २० मालिकेत कमी अनुभव असणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामुळे या मालिकेत रोहित आणि विराट कोहली यांना विश्रांती दिली आहे. ते आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहेत. तर या ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर द.आफ्रिका दौरा आहे. पण या दौऱ्यातही विराट कोहली खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

दक्षिण आफ्रिकामध्ये इंडिया सुरूवातीला टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. २०२३ ते २०२५ या वर्षात स्पर्धेसाठी द. आफ्रिकेसोबत दोन कसोटी सामने होणार आहेत. मात्र विराट कोहलीने व्हाईट बॉल म्हणजे टी २० आणि वनडे सामन्यात काही काळासाठी ब्रेक घेतला असल्याची माहिती बीसीसीआयला दिली असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे, मात्र अजून यावर अधिकृत माहिती समोर आली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी