25 C
Mumbai
Thursday, February 1, 2024
Homeराजकीयदत्ता दळवी, नाम तो सुना होगा !

दत्ता दळवी, नाम तो सुना होगा !

शिवसेना संस्थापक दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंनी अनेक शिवसैनिक घडवले होते. त्यातील काही शिवसैनिक अजूनही आहेत. शिवसेना ही मुंबई, महाराष्ट्राचा जीव असल्याची चर्चा असायची. अशातच बाळासाहेबांनी आनंद दिघेंसारखे शिवसैनिक घडवले. त्यातील आजही अनेकजण आहेत आणि काही ईडीच्या धाकाने उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत गेले आहेत. मात्र संजय राऊतांसारखे नेते अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. अशातच काही कट्टर शिवसैनिकांपैकी एक शिवसैनिक म्हणजे दत्ता दळवी (Datta dalvi) आहेत. शिवराळ भाषा, वागण्यात बेदरकारपणा, मुंबईचे माजी महापौर, धाडसी आणि आक्रमक शिवसैनिक म्हणून आजही दत्ता दळवींची लोकं आठवण काढतात. दत्ता दळवी हे नाव मध्यंतरी शांत होते, मात्र पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे.

कडवट शिवसैनिकांपैकी बाळासाहेबांच्या विश्वासातील सच्चा आणि कडवट शिवसैनिक म्हणजे दत्ता दळवी आहेत. भांडुपमध्ये रविवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जाहीर भाषणात शिवीगाळ केली. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत अटक केली असून दत्ता दळवी हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

हे ही वाचा

विराट कोहली टी २० खेळणार का?

‘नालायक’ शब्दावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा

सारा तेंडुलकरचे शिक्षण किती? सोशल मीडियावर पोस्ट करत केला खुलासा

कोण आहेत दळवी?

शिवसेना स्थापनेच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंनी अनेक निस्सीम कार्यकर्ते कडवट शिवसैनिक तयार केले होते. त्यापैकी दत्ता दळवी हे नाव आहे. दळवींनी आपली सामान्य शिवसैनिक म्हणून कारकीर्द केली आहे. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढं आले. आणि बाळासाहेबांचे विश्वासू बनले. शिवसेना विभागप्रमुख ७ ची त्यांनी जबाबदारी घेतली आहे. त्यानंतर मुंबईचे महापौर म्हणून त्यांनी २००५ ते २००७ सालात काम केलं आहे. ईशान्य मुंबईत दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे. आज अनेक शिवसेना मंत्री, आमदार, खासदार शिंदे गटात गेले आहेत. मात्र दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.

दत्ता दळवींना न्यायालयीन कोठडी

दत्ता दळवींच्या शिवीगाळ करण्याच्या कृत्यावर भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (A) 153 (B) 153 (A) (1) कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी