राज्यात शिवसेना शिंदे गटाची सत्ता येऊन आता वर्ष उलटून गेले. त्याप्रमाणे शिवसेना, अजित पवार गट आणि भाजप चांगलं काम करत आहे, असे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे म्हणणं आहे. हे सरकार आता वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यामुळे सामान्यांना याचा चांगला फायदा होत आहे. शिंदे सरकारने काही महिन्यांपूर्वी महिलांना तिकिटाच्या रकमेवरील निम्मी किंमत आकारण्याचे आश्वासन दिलं होतं आणि ते पूर्णही केलं. यानंतर आता महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरेंनी महिलांच्या रोजगारासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी पिंक रिक्षा योजना राबवली असल्याची माहिती मंत्रालयात दिली आहे.
‘या’ शहरात पिंक रिक्षा योजना होणार सुरू
महिला आणि बालकल्याण विभागासाठी मंगळवारी आदिती तटकरे मंत्रालयात आल्या असता, त्यांनी महिला रोजगार आणि महिला प्रवासासाठी सुरक्षित सेवा मिळाव्यात म्हणून मंत्रालयात आदिती तटकरेंनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी योजनेबाबत भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की ही योजना परिपूर्ण करावी या योजनेत लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य, बॅंका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. प्रायोगिक तत्त्वांवर मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि ठाणे या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचा विचार आहे.
महत्त्वाचं म्हणजे देशात बलात्काराच्या अनेक घटना घडत आहेत. या पिंक रिक्षा केवळ महिलांसाठी असणार असून याचा फायदा आता महिलांना घेता येऊ शकतो. यामुळे महिलांचा त्रास कमी होणार आहे. या योजनेचं आणि निर्णयाचं सर्वीकडे कौतुक होतंय.
हे ही वाचा
नेरूळमध्ये रूग्णवाहिकेतून खेचून तरूणावर चाकूने सपासप वार
‘व्यसनमुक्तीसाठी सेवाभावींचा हात’
दरम्यान, महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करण्यासाठी सरकारच्या सर्व विभागांशी समन्वय साधून गरजू लाभार्थी निवड निकष तपासून राज्यात ही योजना राबवण्यात यावी, अशा सूचना आदिती तटकरेंनी दिल्या आहेत.
बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्वसामावेशक असे बालधोरण महिला व बालविकास विभाग तयार करण्यात येत आहे. जनतेच्या सूचना मागवण्यासाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे.