29 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeमनोरंजनसारा तेंडुलकरचे शिक्षण किती? सोशल मीडियावर पोस्ट करत केला खुलासा

सारा तेंडुलकरचे शिक्षण किती? सोशल मीडियावर पोस्ट करत केला खुलासा

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही नेहमीच चर्चेत असते. तिनं अनेकदा चाहत्यांची मने देखील जिंकली आहेत. ती सदैव डाऊन टू अर्थ असते, हे याआधी अनेकदा पाहिलं आहे. मध्यंतरी सारा आणि टीम इंडियाचा क्रिकेटर शुभमन गिलचे अफेयर असल्याच्या चर्चा होत्या. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. याच सोशल मीडियामुळे सारा तेंडुलकर अधिकाधिक चर्चेत येण्याचं कारण आहे. चाहत्यांना नेहमीच आपल्या पसंतीच्या सेलिब्रिटी विषयी जाणून घ्यावसं वाटतं. सारा तेंडुलकरचं शिक्षण किती? ती कोणत्या विद्यापीठातून शिकत आहे? तिच्या अभ्यासाचा विषय कोणता? याबाबत माहिती तिनं स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितली आहे.

सारा तेंडुलकरची आई अंजली तेंडुलकर या देखील डॉक्टर आहेत. त्याचप्रमाणे, साराने आपल्या आईचे अनुकरण करत वैद्यकीय शिक्षण लंडन विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. तिनं मास्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं असून सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो हा लंडन विद्यापीठातला असून ‘निकालाचा दिवस’ असं तिनं त्या फोटोला कॅप्शन दिलं आहे. साराने क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन या कोर्समधून पदवी मिळवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

हे ही वाचा 

महिलांसाठी ‘पिंक रिक्षा’ ‘या’ शहरात होणार सुरू

‘तुम्ही गोट्या खेळत होता का’?

नेरूळमध्ये रूग्णवाहिकेतून खेचून तरूणावर चाकूने सपासप वार

सारा तेंडुलकरचे शिक्षण किती? सोशल मीडियावर पोस्ट करत केला खुलासा

साराचं मुंबईमध्ये धीरूभाई अंबानी शाळेमध्ये शालेय शिक्षण झालं आहे. तर २०१८ ला तिचं पदवीचं शिक्षण झालं आहे. सारा आणि सोशल मीडिया हे जणू एक नातंच तयार झालं आहे. कारण ती सोशल मीडियावर सतत फोटो अपलोड करत असते. हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र यावर अजूनही साराने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी