32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
HomeराजकीयPM केअर फंडातून महाराष्ट्राला दिलेले व्हेंटिलेटर खराब अन् बिनकामाचे, विनायक राऊतांचा संसदेत...

PM केअर फंडातून महाराष्ट्राला दिलेले व्हेंटिलेटर खराब अन् बिनकामाचे, विनायक राऊतांचा संसदेत घणाघात

टीम लय भारी

नवी दिल्लीः कोविड महामारी सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच कोविड परिस्थितीवर (Covid in India) लोकसभेत चर्चा होत आहे(Vinayak Raut’s blow in Parliament)

विषयाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shiv Sena Vinayak Raut) यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आणि आरोप केला केला की महाराष्ट्राला एकूण पुरविण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी 60 टक्के व्हेंटिलेटर (ventilators unoperational) हे खराब होते.

महापरिनिर्वाणदिनी मुंबईकरांनो ऑनलाईन अभिवादन करा, महापौरांचे आवाहन

आशिष शेलार, तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शेलारांना टोला!

महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात कोविडची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना पीएम केअर (PM Cares) अंतर्गत राज्यांना व्हेंटिलेटरचे वाटप करण्यात आले होते. पण महाराष्ट्रात जे हजारो व्हेंटिलेटर पुरवण्यात आले होतेस त्यापैकी 60 टक्के व्हेंटिलेटर कामच करत नव्हते, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. याबाबत चौकशी करण्याची मागणीही राऊत यांनी संसदेत केली आहे.

भारतातील प्राणघातक दुसऱ्या कोविड लाटेत, भारतातील अनेक लोकांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर बेडची अनुपलब्धता यामुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र, केंद्र सरकारने दुसऱ्या लाटेत भारतात ऑक्सिजनची कमतरता असल्याचे कधीही मान्य केलेले नाही.

अमृता फडणवीसांच्या आवजाची जादू पुन्हा एकदा ऐकायला मिळणार, आगामी मराठी चित्रपटासाठी गायलं गाणं!

Shiv Sena hits out at government in Parliament for favouring BJP-ruled states in COVID-19 management

धारावी पॅटर्नची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

खासदार विनायक राऊत यांनी गेल्या वर्षीच्या संसदेच्या अधिवेशनातही भारतातील कोविड परिस्थितीवर चर्चेची विनंती केली होती. पण ती मान्य केले गेले नाही.

त्यामुळे सध्याच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी कोविड परिस्थितीवर चर्चा करण्याची पुन्हा मागणी केली. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मीडियाशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, शेवटी संसदेत कोविडवर काही चर्चा होईल.

हे गेल्या वर्षीच घडायला हवे होते. गेल्या वर्षी ही मागणी मान्य झाली असती, तर भारतात परिस्थिती वेगळी असती. वैद्यकीय तयारी, लसीकरण मोहीम, कोविडवरील एकूणच प्रतिबंधात्मक उपायांवर संसदेत चर्चा अपेक्षित होती.

विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मुंबई आणि महाराष्ट्राने ज्या प्रकारे कोविड परिस्थितीवर नियंत्रण आणले, त्याचे जगाने कौतुक केले आहे. धारावी पॅटर्नची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली, आणि आता मुंबईतील कोविडची परिस्थिती नियंत्रणात आहे, असे ते म्हणाले.

भारतात कोविड परिस्थिती पुन्हा गंभीर

नवीन कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकारानंतर, जगातील सर्व देश चिंतेत आहेत. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतानेही प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत omicron व्हायरस किमान 23 देशांमध्ये पसरला आहे.

भारतातही कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले ज्यांनी उच्च जोखमीच्या देशांतून प्रवास केला आहे जेथे ओमिक्रोम रुग्ण आहेत. मात्र, आत्तापर्यंत भारतात कोणीही ओमिक्रोमने प्रभावित झालेले आढळले नाही.

पण सर्व राज्ये हाय अलर्टवर आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आज दुपारी भारतातील कोविड परिस्थितीवर पत्रकार परिषद घेणार आहे. आणखी काही निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी