33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्राईम80 अधिक गुन्हे असलेल्या बृजभूषणांवर 'पोक्सो' चा गुन्हा दाखल; तुरूंगात टाकण्याची कुस्तिगिरांची...

80 अधिक गुन्हे असलेल्या बृजभूषणांवर ‘पोक्सो’ चा गुन्हा दाखल; तुरूंगात टाकण्याची कुस्तिगिरांची मागणी

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष वृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कथित आरोपाप्रकरणी दिल्ली पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर दिल्लीतील कनॉट प्लेस पोलिस स्थानकात दोन एफआयआर नोंदवण्यात आले. पहिला एफआयआर अल्पवयीन मुलीद्वारे करण्यात आलेल्या आरोपसंदर्भात आहे. याच प्रकरणात पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा एफआयआर महिला कुस्तीपटूंनी दिलेल्या तक्रारीच्या नोंदवण्यात आधारे आला आहे. दोन्ही प्रकरणांत गंभीर दखल घेण्यात आली आहे.

पहिल्या दिवशीच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण त्यासाठी सहा दिवस लागले. ही लढाई गुन्हा दाखल करण्यापुरती मर्यादित नाही. त्यांच्याविरोधात आधीच 85 गुन्हे दाखल आहेत. पण, त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मग, आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने, त्यांना काही फरक पडणार नाही. त्यांना सर्व पदांवरून हटवत, तुरुंगात टाकले पाहिजे, अशा भावना कुस्तिगीरांनी व्यक्त केल्या आहेत.

बृजभूषण यांच्याविरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा दिल्ली पोलिस बृजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली होती, न्यायालयीन सुनावणीनंतर दिल्ली पोलिसांची कारवाई त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. सिंह यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी सोमवारी (24 एप्रिल) कुस्तीगिरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर शुक्रवारी (28 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा दिल्ली पोलिसांकडून आजच बृजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. त्यानुसार ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

हे सुद्धा वाचा:

कुस्तीगीर पुन्हा एकदा आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सज्जड इशारा

भारतीय कुस्ती महासंघाविरोधात कुस्तीगीरांची निदर्शने

बॉक्सिंग दिग्गज मेरी कोम करणार 5 सदस्यीय सरकारी पॅनेलचे नेतृत्व; ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची होणार चौकशी

BrijBhushan Singh, POCSO case filed against BrijBhushan singh, Wrestlers demands to jail BrijBhushan

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी