36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeजागतिकमॉरिशसमध्ये महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण; महाराष्ट्र भवनाबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा

मॉरिशसमध्ये महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण; महाराष्ट्र भवनाबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा

महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मॉरिशसमध्ये अनावरण करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता. मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनला महाराष्ट्र भवनच्या विस्तारासाठी 8 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. त्याचप्रमाणे मॉरिशसमधील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्याशी सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिमाखदार अनावरण सोहळ्याप्रसंगी मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, इतर मंत्री, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद प्रामुख्याने उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी भगिनी आणि बांधव पारंपरिक पोषाखात कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.

मॉरिशसमध्ये महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण; महाराष्ट्र भवनाबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा
मॉरिशसमध्ये महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

महाराजांचा हा अश्वारुढ पुतळा 14 फुट उंचीचा असून फायबर ग्लास मिडीयममध्ये तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मॉरिशियमधील हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. नाशिक येथील शिल्पकार विकास तांबट यांनी हा पुतळा तयार केला असून यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागला आहे.

हे सुद्धा वाचा:

कर्नाटक निवडणूक प्रचार : देवेंद्र फडणवीस यांचा कानडी बाणा

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेऊन भाजप बनविणार पर्यायी सरकार, राज्याला मिळणार नवे नेतृत्व !

एकनाथ शिंदे यांना जोर का झटका ; शिवसेना भवन आणि संपत्तीवर हक्क सांगणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली..!

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Mauritius, Devendra Fadanvis announcement about Maharashtra Bhavan in Mauritius

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी