27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeक्राईमपरीक्षा आयुक्त शैलजा दराडे यांच्यावर गुन्हा; कायमस्वरुपी नोकरीचे आमिष दाखवून 45 शिक्षकांना...

परीक्षा आयुक्त शैलजा दराडे यांच्यावर गुन्हा; कायमस्वरुपी नोकरीचे आमिष दाखवून 45 शिक्षकांना लाखो रुपयांचा चुना

शिक्षकांना कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सन 2019 मध्ये दराडे शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी राज्यभरातील तब्बल 45 शिक्षकांना कायम स्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 12 ते 14 लाख रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दराडे यांच्यासोबत त्यांचा भाऊ देखील या प्रकरणी अडचणीत आला असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Registered Against Shailaja Darade, Commissioner of Maharashtra State Examination Council)

आडपाडी तालुक्यातील (जि. सांगली) शिक्षक पोपट सुर्यवंशी यांनी याबाबत हडपसर (पुणे) पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दराडे यांनी कायम स्वरुपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत डी.एड झालेल्या शिक्षकांकडून 12 लाख तर बी.एड झालेल्या शिक्षकांकडून 14 लाख रुपये त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्या मार्फत उकळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; वाचा काय आहे प्रकरण
ईडीचा गुन्हा रद्द करावा यासाठी छगन भुजबळ यांची याचिका
दादरचे शिवसेना भवन ठाण्यात स्थलांतरित

सुर्यवंशी यांचे नातलग असलेल्या दोन महिला शिक्षकांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 12 आणि 14 लाख रुपये शैलजा दराडे यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांनी घेतले. मात्र दोन भरती प्रक्रीया पार पडून देखील त्यांना नोकरी न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मागितले असता दराडे बंधू भगिनीने पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर सुर्यवंशी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश देले होते. दरम्यान शैलजा दराडे यांना आपल्या भावाचे असे कृत्य लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संबंध तोडले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी