28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमसर्वोच्च न्यायालयानंतर उच्च न्यायालयातही नवाब मलिकांच्या पदरी निराशा

सर्वोच्च न्यायालयानंतर उच्च न्यायालयातही नवाब मलिकांच्या पदरी निराशा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यास आज न्यायमूर्ती यांनी नकार दिला.नवाब मलिक यांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठात ही सुनावणी सुरू आहे.मलिक यांच्या अर्जावर आता 6 जून रोजी सुनावणी होणार आहे.

नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉडरिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे.गेल्या वर्षभरा पासून ते जेल मध्ये आहेत.त्यांच्या विरोधात एन आय ए ने गुन्हा दाखल केला आहे.नवाब आजारी आहेत. त्यांना किडनीचा आजार आहे. यामुळे ते उपचार घेण्यासाठी कुर्ला येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत.त्यांची एक किडनी निकामी झाली आहे.यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या आजारपणाच्या कारणास्तव त्यांनी जामीन मिळावा म्हणून मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे.

हे देखिल वाचा

पवार साहेबांचे विचार घेऊन एकलव्यासारखं निष्ठेने काम करत राहू : प्रशांत विरकर

शरद पवार म्हणाले, माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे !

बाळासाहेबांनीही दिला होता शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा ….

नवाब मलिक यांनी जामीनसाठी अर्ज करून आता तीन महिने झालेत.मात्र, त्यांचा अर्जावर सुनावणी होत नाही.सतत तारखा पडत असतात.आज देखील सुनावणी होती.ही सुनावणी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या कोर्टात होती. यावेळी मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घ्यावी म्हणून सुमारे 20 मिनिटं युक्तिवाद केला. मात्र, न्यायमूर्ती यांनी तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.अनेक खटले प्रलंबित आहेत.त्यामुळे तुमच्या जामीन अर्ज तात्काळ ऐकता येणार नाही, अस कोर्टाने सुनावलं. यानंतर जामीन अर्जावर पुढच्या महिन्यात 6 जून रोजी सुनावणी करण्यात येईल, अस कोर्टाने सांगितलं.

After the Supreme Court, Nawab Malik’s position is also disappointed in the High Court

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी