26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeक्राईमदिल्लीत कारने तरुणीला चार किमी फरफटत नेले; मृत तरुणीची आई म्हणाली हा...

दिल्लीत कारने तरुणीला चार किमी फरफटत नेले; मृत तरुणीची आई म्हणाली हा कसला अपघात?

नवीन वर्षाच्या आगमनालाच दिल्लीतील सुलतानपुरीमध्ये  (Sultanpuri) काळीज पिवळवटून टाकणारी घटना समोर आली. एका तरुणीला कारने धडक दिल्यानंतर तब्बल ४ किलोमीटर पर्यंत तीचा मृतदेह फरफटत (Delhi Girl car Dragging) नेला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीत नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पाच जणांना अटक केली आहे. तर दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women) देखील या प्रकरणात लक्ष घातले असून महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना खरमरीत पत्र पाठवले आहे. तर नागरिकांनी देखील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक कार तरुणीला चार-पाच किलोमीटर फरफटत नेत असताना पोलिसांना याची माहिती कशी मिळाली नाही? असा सवाल केला आहे. तर मृत तरुणीच्या आईने हा अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघात प्रकरणातील ५ तरुणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी डॉक्टरांचे पथक नेमण्यात येणार आहे. तर अपघात प्रकरणात अटक केलेल्या तरुणांवर कलम भारतीय दंड संहितेच्या ३०४ नुसार गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान मृत मुलीच्या आईने माध्यमांना सांगितले की, मी मुलीशी रात्री नऊ वाजता बोलेले होते. तीने सांगितले होते की, ती तीन ते चार वाजे पर्यंत घरी येईल. माझी मुलगी लग्न समारंभांच्या इव्हेंट प्लॅनिंगचे काम करत होती. मला पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी मुलीचा अपघात झाल्याचे सांगितले. त्यानंतर मला पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले मात्र मला खुप वेळ ताटकळत ठेवल्याचा आरोप देखील मुलीच्या आईने केला आहे. दरम्यान माझा भाऊ पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्या नंतर माझ्या भावाने मला मुलीच्या मृत्यू झाल्याचे सांगितले. माझी मुलगी हीच माझ्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. तीने चांगले अंगभर कपडे परिधान केले होते. मात्र तीच्या मृतदेहावर कपड्याचा एक तुकडा देखील नव्हता. हा कसला अपघात आहे? असा सवाल देखील मुलीच्या आईने केला आहे.दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मृत मुलीला न्याय मिळावा असे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

क्लास वन अधिकारी कल्याणकारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात; आजपासून सामूहिक रजेवर, सिल्लोडमधील अब्दुल सत्तार यांच्या कृषि महोत्सवावर बहिष्कार

शिंदे सेनेची दादागिरी आजिबात चालणार नाही – भाजपा

आरएसएसचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी; पोलीस सुरक्षा वाढविली

दरम्यान समाजमाध्यमांवर लोक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही असा सवाल देखील लोक समाजमाध्यमांवरुन करत आहेत. दरम्यान या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधीत कारच्या मागे एक कुत्रा लागल्याचे देखील दिसत आहे. मात्र कार जेव्हा युटर्न घेते तेव्हा कुत्रा थांबल्याचे दिसत असून तो त्या कारकडे पाहत असल्याचे देखील दिसत आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी