29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्राईमजपान टूरच्या नावाखाली घातला 8 लाखांचा गंडा! पूर्वा हॉलिडेज टूरच्या संचालकाविरोधात गुन्हा...

जपान टूरच्या नावाखाली घातला 8 लाखांचा गंडा! पूर्वा हॉलिडेज टूरच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल

शहरातील बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याला जपान टूरसाठी क्रेडिट नोट व २ लाखांचा डिस्काऊंट देण्याचे आमिष दाखवून दहिसरच्या पूर्वा हॉलिडेज्‌च्या संशयिताने तब्बल ७ लाख ९२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वा हॉलिडेज टूरचा संचालक तेजस महेंद्र शहा (रा. मीरारोड पूर्व, ठाणे) असे संशयिताचे नाव आहे. रंजना प्रफुल्ल शहा (६६, रा.ऋषभ बंगला, नवी पंडित कॉलनी, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित तेजस शहा याने गेल्या वर्षी रंजना व त्यांचे पती प्रफुल्ल शहा यांच्या व्हॉटसॲपवर न्युझीलंड टूरची जाहिरात टाकली.

शहरातील बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याला जपान टूरसाठी क्रेडिट नोट व २ लाखांचा डिस्काऊंट देण्याचे आमिष दाखवून दहिसरच्या पूर्वा हॉलिडेज्‌च्या संशयिताने तब्बल ७ लाख ९२ हजार रुपयांचा गंडा (Duped) घातला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वा हॉलिडेज टूरचा संचालक तेजस महेंद्र शहा (रा. मीरारोड पूर्व, ठाणे) असे संशयिताचे नाव आहे. रंजना प्रफुल्ल शहा (६६, रा.ऋषभ बंगला, नवी पंडित कॉलनी, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित तेजस शहा याने गेल्या वर्षी रंजना व त्यांचे पती प्रफुल्ल शहा यांच्या व्हॉटसॲपवर न्युझीलंड टूरची जाहिरात टाकली.(Duped of Rs 8 lakh in the name of Japan tour! Case filed against purva holidays tour director)

या टूरवर ५० टक्के क्रेडिट नोट तसेच पुढच्या विदेशी दूरसाठी ती वापरता येणार होती. त्यामुळे शहा दाम्पत्याने जून महिन्यात संशयित शहाच्या खात्यावर ७ लाख ९२ हजार रुपये ऑनलाईन वर्ग केले. त्यानंतर त्यांची न्युझीलंड व ऑस्ट्रेलियाची टूर झाली. त्यामुळे त्यांच्या संशयितांवर विश्वास बसला.

दरम्यान, संशयिताने जपान टूरची माहिती दिली. त्यासाठी क्रेडिट नोटनुसार त्यांना ३ लाख ६० हजार रुपये संशयित देणार होता. तसेच २ लाखांचा डिस्काऊंटही देणार होता. त्यामुळे शहा दाम्पत्याने जपान टूरसाठी १ जानेवारी २०२४ राेजी ७ लाख ९२ हजार रुपये संशयिताच्या पूर्वा हॉलिडेजच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर १८ मार्च रोजी टूर जाणार होती, परंतु गेली नाही.

त्यानंतर २० मार्चलाही गेली नाही. यामुळे मनस्ताप झालेल्या शहा दाम्पत्यांनी संशयिताकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक गावडे या तपास करीत आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी