29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्राईमभुजबळ फार्मवर ड्रोन उडविला;फोटोग्राफरवर गुन्हा

भुजबळ फार्मवर ड्रोन उडविला;फोटोग्राफरवर गुन्हा

नाशिकमधील लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी रणशिंग फुंकले आहे. छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळ फार्मवर ड्रोन फिरल्याने मोठी खळबळ उडाली होती. राज्याचे अन्न व नागरी पुरवठ्याची मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील लेखा नगर जवळ असलेल्या भुजबळ फार्म परिसरात ड्रोन (Chhagan Bhujbal Farm flew a drone) उडवणे एका व्यवसायिको छायाचित्रकाराला महागात पडले आहे. संशयीत आरोपी पवन राजे सोनी २९ राहणार राणेनगर पाथर्डी फाटा या छायाचित्रकाराविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ फार्म परिसरात शुक्रवारी दिनांक पाच सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ड्रोन ने गिरट्या घातल्या होत्या.(flew a drone at The Bhujbal Farm; Crime against photographer )

यामुळे येथील सुरक्षारक्षकांना रेकीचा संशय आला होता येथील सुरक्षा अधिकारी दीपक मस्के यांनी आंबड पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी भुजबळ फार्म येथे भेट देऊन पहाणे केली होती. या प्रकरणी भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. राऊत यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचा आदेश दिला होता. यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर शुक्रवारी सोनी यांनी विनापरवाना ड्रोन उड्डाण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामुळे ड्रोन उड्ढा नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कलम 50 अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.

भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडवणारा निघाला फोटोग्राफर
आता भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडवणारा एक फोटोग्राफर आहे. विनापरवानगी ड्रोन उडविणाऱ्या फोटोग्राफरविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित पवन राजेश सोनी (29, रा. नागरेनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हा फोटोग्राफर असून, त्याने दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भुजबळ फार्म परिसरात कुठलीही परवानगी न घेता ड्रोन उडविला होता, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

लग्नकार्यासाठी ड्रोन उडवला आणि अडकला:
पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयित फोटोग्राफरने लग्न सोहळ्यासाठी ड्रोन वापरल्याचा दावा केला आहे. मात्र त्यासाठी कोणताही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
फोटोग्राफरने लग्न सोहळ्यासाठी ड्रोन वापरल्याचा दावा केला आहे. मात्र त्यासाठी कोणताही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी