30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयकाश्मिर पटेलांना नको होते, पण पंडित नेहरूंनी भारतात आणले !

काश्मिर पटेलांना नको होते, पण पंडित नेहरूंनी भारतात आणले !

काश्‍मीर प्रश्‍नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात आहे. यासाठी इतिहासातील घडामोडींची सोयीची मांडणी केली जाते. काश्‍मीरची समस्या हाच नेहरुंच्या धोरणांचा परीणाम आहे आणि काश्‍मीरसाठी स्वायत्तता देणारं 370 कलम आणणं हीच मुळात घोडचूक होती ती दुरुस्त केली की काश्‍मीरची समस्याच संपेल असं मानणारेही आहेत

काश्‍मीर प्रश्‍नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा
वर्ग देशात आहे(Kashmir in India because of Jawaharlal Nehru). यासाठी इतिहासातील घडामोडींची सोयीची मांडणी केली जाते. काश्‍मीरची
समस्या हाच नेहरुंच्या धोरणांचा परीणाम आहे आणि काश्‍मीरसाठी स्वायत्तता देणारं 370
कलम आणणं हीच मुळात घोडचूक होती ती दुरुस्त केली की काश्‍मीरची समस्याच संपेल
असं मानणारेही आहेत. ते एकतर भाबडे आहेत किंवा सारं माहित असूनही राजकीय पोळ्या
भाजू पहाणारे धूर्त आहेत. या राजाकरणजीवींपलिकडं नेहरुंना दोष देणाऱ्यांची ऐतिहासिक
जाणिव बहुदा समाजमाध्यमी माहितीच्या तुकड्यावंर पोसलेली असते. नेहरु काश्‍मीर आणि
चीन यात असा अवघा गोंधळ कित्येक दशकं सुरु आहे. तेव्हा यातलं वास्तव काय हे
तपासताना इतिहासातील घटनांना तर्काच्या कसोटीवर घासून पाहणं प्रस्तूत ठरतं.
नमस्कार मी सुजाता शिरसाठ-शेकडे, आपणा सर्वांचं लय भारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. लय भारीने काही दिवसांपूर्वी प्रकाशीत केलेल्या गांधी-नेहरू यांनी देशाचं खरचं नूकसान केलं का ….या विशेषांकातील काही लेखांची माहीती देणारी मालिका सुरू केलेली आहे. त्यातीलच आजचा लेख आहे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांचा, नेहरू चाणाक्ष, धूर्त की भाबडे……

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी