30 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeक्राईममुंबई-आग्रा महामार्गावरील मुंगसे फाटा बनला मृत्यूचा सापळा

मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंगसे फाटा बनला मृत्यूचा सापळा

मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंगसे फाट्यावर भरधाव वेगात जाणाºया बसने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना चिरडले. अपघातानंतर बसने तब्बल दोनशे ते तीनशे फुटांपर्यंत तिघांना फरपटत नेल्याने यातील दोन जण जागीच ठार झाले, तर एक बालिका गंभीर जखमी झाली आहे. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मुंगसे फाट्यावर गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर तब्बल तीन तास रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंगसे फाट्यावर मंगळवारी (दि.१६) सकाळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले सीताराम उत्तम सूर्यवंशी (वय ६०), वैष्णवी विजय सूर्यवंशी (वय १२), मंजुषा विजय सूर्यवंशी (वय १४) यांना भरधाव बसने चिरडले. बस एवढ्या वेगात होती की, अपघातानंतर बसने तिघांनाही तीनशे फुटांपर्यंत फरपटत नेले. त्यामुळे यातील दोघांचा मृत्यू झाला.

(Mumbai-Agra highway)मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंगसे फाट्यावर (Mungse Phata) भरधाव वेगात जाणाºया बसने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना चिरडले. अपघातानंतर बसने तब्बल दोनशे ते तीनशे फुटांपर्यंत तिघांना फरपटत नेल्याने यातील दोन जण जागीच ठार झाले, तर एक बालिका गंभीर जखमी झाली आहे. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मुंगसे फाट्यावर गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर तब्बल तीन तास रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंगसे फाट्यावर मंगळवारी (दि.१६) सकाळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले सीताराम उत्तम सूर्यवंशी (वय ६०), वैष्णवी विजय सूर्यवंशी (वय १२), मंजुषा विजय सूर्यवंशी (वय १४) यांना भरधाव बसने चिरडले. बस एवढ्या वेगात होती की, अपघातानंतर बसने तिघांनाही तीनशे फुटांपर्यंत फरपटत नेले. त्यामुळे यातील दोघांचा मृत्यू झाला. (Mungse Phata on Mumbai-Agra highway turns into death trap)

एक बालिका गंभीर जखमी असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीचीही प्रकृती गंभीर असल्याने परिरातील संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत घटनास्थळी रास्ता रोको केला. जोपर्यंत फाट्यावर गतिरोधक बसवत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,असा पवित्रा मुंगसे येथील ग्रामस्थांनी घेतल्याने तब्बल तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मात्र, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी घटनास्थळी दाखल होत मध्यस्थी करीत ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तसेच या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसवण्यात येईल, संबंधितांना त्या संदर्भात सूचना करण्यात येतील, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यानंतर तब्बल तीन तासांनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.

महामार्गावरील मुंगसे फाटा, हॉटेल लब्बैक, सवंदगाव फाटा, चाळीसगाव फाटा हे ठिकाण अपघाताचे केंद्र बनले आहे. या रस्त्यावर सर्व्हिस रोड व भुयारी मार्ग बनवावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. रस्ते महामार्ग व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सातत्याने अपघात होवून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. शहरातील पूर्व भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३ च्या पलीकडे लब्बैक हॉटेल, गट नं. ८०, गट नं. ७६, असफा इब्राहिम मस्जिद, अनिस क्रेनवाला सायजिंग व नागरी वस्त्या उदयास आल्या आहेत.भुयारीमार्ग व सर्व्हिस रोड नसल्याने नागरिक जीव मुठीत धरुन प्रवास करतात. मनमाड चौफुली ते चाळीसगाव फाट्यापर्यंत रस्त्यावर लहान गतिरोधक आहेत. त्यांना पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांना गतीरोधक दिसत नाहीत.समोरुन भरधाव येणाऱ्या गाडीला विरुद्ध येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. यासाठी येथील विविध पक्षांनी आंदोलने केली. लब्बैक हॉटेल, सवंदगाव फाटा या ठिकाणी सर्वात जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने तातडीने भुयारी मार्ग व सर्व्हिस रोड करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख व नागरिकांकडून केली जात आहे .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी