38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeव्हिडीओतुम्ही देखील पहिल्यांदा मतदान करताय ? तर हि खबरदारी जरूर घ्या

तुम्ही देखील पहिल्यांदा मतदान करताय ? तर हि खबरदारी जरूर घ्या

जर तुम्ही देखील लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार असाल तर मतदान करताना किंवा ,मतदान करायला जाताना कोणती खबरदारी बाळगायला हवी हे आपण जाणून घेऊया

ह्या वर्षी देशात १.२ कोटी नागरिक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत( This year 1.2 crore citizens are going to vote for the first time in the country). जर तुम्ही देखील लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार असाल तर मतदान करताना किंवा ,मतदान करायला जाताना कोणती खबरदारी बाळगायला हवी हे आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर अठरा वर्ष पूर्ण असतील किंवा अठरावा वाढदिवस जवळ आला असेल तरी देखील तुम्ही मतदान करू शकता . त्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम तुमचे जवळचे मतदान केंद्र शोधा यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ voters.eci.gov.in या संकेतस्थळाची देखील मदत घेऊ शकता याशिवाय तुम्ही निवडणूक आयोगाच्या मतदार हेल्पलाईनचा वापर देखील करू शकता त्यानंतर तुम्हाला मतदार यादीत तुमच नाव आहे कि नाही ते पाहावं लागेल त्यासाठी www.nvsp.in या वेबसाईटला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हला तुमचे नाव दिसत नसल्यास registration for new Electoral या पर्यावर क्लिक करा येथे नाव जन्म तारीख , पत्ता , आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्याचबरोबर ज्या दिवशी मतदान करायला जाल त्या दिवशी मतदान कार्ड आठवणीने सोबत घेऊन जाण गरजेचं असतं त्याचसोबत आधार कार्ड, पॅन कार्ड , वाहन परवाना या पैकी कोणतंही एक सरकारी ओळखपत्र सोबत ठेवावे कारण मतदार केंद्रावर गेल्यावर तेथील अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जाते त्यासोबतच मतदान केंद्रावर जाताना इलेक्ट्रिक गॅजेट सोबत घेऊन जाण्यास परवानगी नसते मोबाइल फोन , कॅमेरा , इअर फोन , हेड फोन किंवा स्मार्ट वॉच सोबत घेऊन जाऊ नये असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी