32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्राईमपवई आयआयटी : दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

पवई आयआयटी : दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

आयआयटी पवई मध्ये दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणात अटक आरोपी अरमान खत्रीला आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ॲट्रॉसिटी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच खत्री हा जामिनावर तुरुंगातून बाहेर येणार आहे. खत्रीला दलित विद्यार्थी दर्शन सोलंकीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, आज अरमान खत्रीला जामीन मंजूर करताना मुंबई सत्र न्यायालय विशेष ॲट्रॉसिटी कोर्टाने खत्रीला 25 हजाराचा वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन देण्याचा आदेश दिला.

त्याचबरोबर खत्रीने तपासात सहयोग करावं, प्रत्येक महिन्यात सोमवारी आणि मंगळवारी 11 ते 1 या दरम्यान संबंधित पोलीस ठाण्यात आरोपपत्र दाखल होईपर्यंत हजेरी लावावी. या प्रकरणाशी संबंधित कुठल्याही साक्षीदार किंवा अन्य व्यक्तीला धमकावण्याच्या किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न जामिनावर असलेल्या आरोपीला करता येणार नाही, असंही न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या प्रकरणात अरमान खत्रीला 9 एप्रिल 2023 ला मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती.

दर्शन सोलंकीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप खाली आरमान खत्रीला अटक झाली होती. 12 फेब्रुवारी 2023 रोजी दर्शन सोलंकी याने आय आयटी परिसरात स्थित वसतिगृहाचा सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. दर्शन सोलंकी आणि आरमान हे दोघेही रसायनशास्त्राच्या पहिल्या वर्गाचे विद्यार्थी होते. मात्र, आत्महत्या नंतर दर्शन सोलंकीचा मृत्यूपूर्वी लिहिलेला सुसाईड नोट देखील समोर आला होत.अरमान कोहली आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

WWE स्टार सारा लीच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा

एनसीबीच्या कारवाईत 6 कोटीच ड्रग्स जप्त; पुण्याच्या मेडिकल स्टोरमध्ये मिळताहेत बंदी घातलेली औषध

अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार प्रकरणी वृध्दाला 10 वर्ष शिक्षा

काय आहे प्रकरण?

दर्शन सोळंकी हा मुंबईतील पवई आयआयटीचा विद्यार्थी होता. तो केमिकल इंजिनियरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होता.12 फेब्रुवारी रोजी त्याने हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. जातीभेद होत असल्याने त्याने आत्महत्या केली,असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे यातील सत्यता पडताळण्यासाठी आयआयटी मुंबईने १२ सदस्यांची समिती नेमली.
१२ सदस्यीय समितीने यावर आपला अहवाल दिला आहे. दर्शन सोळंकीने जातीभेद असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप या समितीने फेटाळला आहे.यात त्यांनी म्हटलं आहे की, दर्शनने शैक्षणीक कारणास्तव आत्महत्या केली आहे.
दर्शन सोळंकी हा फक्त १८ वर्षांचा होता. तो मुळचा अहमदाबाद येथील होता. तीन महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी तो मुंबईत आला. ११ फेब्रुवारी रोजी त्याची परीक्षा होती. त्याने १२ फेब्रुवारी रोजी कॅम्पसच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी घेतली होती.

पवई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तसचे पुढील तपास सुरू केला होता. त्यावेळी ‘आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल’ या संस्थेने दर्शनने जातीभेदामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. मुंबई आयाआयटीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जातीभेद सुरू आहे. येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या जातीवरून अपशब्द वापरत हिनवले जात, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळेच स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपल्या अहवालात जातीभेदाचा आरोप फेटाळला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी