29 C
Mumbai
Tuesday, August 29, 2023
घरव्हिडीओ'बीबीसी'वर ऑन-एअर ब्लंडर, पाकिस्तानी चॅनेल्ससारखाच फनी शो

‘बीबीसी’वर ऑन-एअर ब्लंडर, पाकिस्तानी चॅनेल्ससारखाच फनी शो

बीबीसी न्यूज अॅंकर लुक्वेसा बुराक ही लंचटाइम सेगमेंट होस्ट करत असताना ही फटफजिती झाली. लुक्वेसा दोन्ही हात वर करून रिलॅक्स होतानाचा सीन लाईव्ह झाला आणि जगाला तिच्या अंडर आर्मचे दर्शन झाले.

‘बीबीसी’वर ऑन-एअर ब्लंडर झाले आहे. पाकिस्तानी चॅनेल्ससारखाच फनी शो झाल्याने सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बीबीसी न्यूज अॅंकर लुक्वेसा बुराक ही लंचटाइम सेगमेंट होस्ट करत असताना ही फटफजिती झाली. लुक्वेसा दोन्ही हात वर करून रिलॅक्स होतानाचा सीन लाईव्ह झाला आणि जगाला तिच्या अंडर आर्मचे दर्शन झाले.

बीबीसी न्यूज अॅंकर ऑफ-गार्ड कॅमेऱ्यावर पकडली गेली. ‘बीबीसी’च्या न्यूज प्रेझेंटरची (अॅंकर) लाइव्ह प्रसारण सुरू असताना चूक झाली. इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरील कॉमेंट्स वाचून तुम्ही हसणे थांबवू शकणार नाही.

 

अॅंकर लाईव्ह असताना बीबीसी न्यूज प्रेझेंटरने केलेल्या मजेदार चुकीचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. अँकर लुक्वेसा बुराक लंचटाइम सेगमेंट होस्ट करत होती. त्यात प्री-रेकॉर्डेड स्निपेट वाजवले जात असताना अॅंकर मस्तपणे दोन्ही हात वर करून रिलॅक्स होत होती. नेमके त्याचवेळी स्निपेट थांबवून कॅमेरा थेट तिच्याकडे रोल झाला. त्यात अॅंकर लुक्वेसा बुराकचे दोन्ही हात वर करून रिलॅक्स होतानाचा सीन लाईव्ह झाला. जगाला तिच्या अंडर आर्मचे दर्शन झाले. साहजिकच एका सेकंदासाठी ती स्तब्ध झाली आणि धक्का बसून कॅमेराकडे पाहत तिने आपले हात खाली सोडले.

बीबीसी न्यूज अॅंकर लुक्वेसा बुराक हिने फटफजिती झालेला व्हिडिओ स्वत:च्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांची हेडर (कव्हर) इमेजही वापरली आहे.
बीबीसी न्यूज अॅंकर लुक्वेसा बुराक हिने फटफजिती झालेला व्हिडिओ स्वत:च्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांची हेडर (कव्हर) इमेजही वापरली आहे. (फोटो क्रेडिट : @LukwesaBurak)

व्हायरल झालेला व्हिडिओ Brexit Shambles नावाच्या पेजने ट्विटरवर शेअर केला आहे. “तर हे आत्ताच बीबीसी न्यूजवर घडले,” अशी ही पोस्ट आहे. ऑनलाइन शेअर केल्यानंतर या व्हिडिओला थोड्याच वेळात जवळपास 9 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियात काही लोकांनी तिचे समर्थन करत ही काही फार मोठी चूक नसल्याचे सांगितले. “ही एक संधी चूक आहे! प्रत्येकजण अशी चूक करतो, दुर्लक्ष करा, दयाळू व्हा,” असे अनेक युझर्सनी लिहिले.

हे सुद्धा वाचा : 

द मोदी क्वेश्चन : आयटी कायदा आणीबाणीतील अधिकार वापरुन केंद्राने बीबीसी डॉक्युमेंटरी केली ब्लॉक

बीबीसीची जिहादी ब्राईड शमीमा बेगम पुन्हा वादात ; ब्रिटनवासियांचा कडाडून विरोध

आमचे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य, परिस्थिती शांत होईल अशी आशा करतो; बीबीसीची पहिली प्रतिक्रीया

BBC Anchor Show Underarms, Lukwesa Burak BBC, BBC News presenter caught off guard, BBC on air blunder, BBC Anchor Viral Video

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी