31 C
Mumbai
Thursday, May 11, 2023
घरक्राईमपवईतील आयआयटीच्या विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पवईतील आयआयटीच्या विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पवई येथील ‘आयआयटी’च्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी दुपारी वसतिगृह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे विद्यार्थी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्याने कोणतीही चिट्ठी लिहून ठेवली नाही. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या विद्यार्थ्यांचे नाव पोलिसांनी अद्याप उघड केले नाही. या प्रकरणी पवई पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे. हा विद्यार्थी गुजरातमधील अहमदाबादमध्ये राहणारा असून त्याने बी टेकच्या रासायनिक अभियांत्रीकी शाखेत प्रवेश घेतला होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. (Powai IIT student commits suicide by jumping from building)

या विद्यार्थ्याने शनिवारी पहिल्या सत्राची परीक्षा दिली होती. मृत विद्यार्थ्याला संरक्षक भीतीवर चढताना अन्य एका विद्यार्थ्याने पहिले होते. त्याला त्याने ओरडून खाली उतरण्यास सांगितले. पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. इमारतीवरून खाली पडल्यानंतर त्याला आवारात असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली असून त्यांना मुंबईला येण्यास सांगितले आहे. त्यांच्या मुलाचा अपघात झाला असल्याचे पालकांना सांगितले असल्याचे ‘आयआयटी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत विद्यार्थ्याला काही समस्या होती का याबाबत पोलीस त्याचे शिक्षक आणि वर्गमित्रांकडे चौकशी करत आहेत.

Powai IIT student commits suicide by jumping from building

हे सुद्धा वाचा

दिल्लीचे हस्तक एकनाथ शिंदेंमुळेच महाराष्ट्राची अधोगती, संजय राऊतांचा हल्लाबोल

न्यायपालिकाही भाजपच्या मगरमिठीत ; आपल्या मर्जीतल्या न्यायाधीशांना राज्यपाल पदाचे बक्षीस

प्रेमाच्या दिनी दिले होते बलिदान.. व्हॅलेंटाईनचा थरारक इतिहास कसा होता; जाणून घ्या

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी