33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयदिल्लीचे हस्तक एकनाथ शिंदेंमुळेच महाराष्ट्राची अधोगती, संजय राऊतांचा हल्लाबोल

दिल्लीचे हस्तक एकनाथ शिंदेंमुळेच महाराष्ट्राची अधोगती, संजय राऊतांचा हल्लाबोल

दिल्लीचे हस्तक असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान असल्यामुळेच महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची अधोगती होत आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना कोणीही मुख्यमंत्री मानायला तयार नाही. देशातील पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्येही त्यांचे नाव नाही, हे दुर्दैव आहे”. राज्याच्या अधोगतीबद्दल राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरले आहे. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. मात्र, मागील सहा-सात महिन्यांत हे राज्य देशाच्या खिजगणतीतही नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राज्याचा विकास काही जणांना पाहवत नाही. महाराष्ट्राचे पंख छाटण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांचा पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश होत होता. त्यानंतर ते चौथ्या क्रमांकावर आल्यामुळेच आकसापोटी माविआ सरकार पाडण्यात आल्याचे राऊत म्हणाले. (Maharashtra’s downfall is due to Delhi’s agent Eknath Shinde)

अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. त्याबाबत राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, “राहुल गांधी यांना नोटीस बजवण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यांनी लोकसभेत जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्या प्रश्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरं द्यायला हवी होती. मात्र, या प्रश्नांची उत्तरं न देता राहूल गांधींना नोटीस बजावण्यात आली. हक्कभंगाची कारवाई तर पंतप्रधान मोदींवर व्हायला हवी होती. मात्र, ती राहुल गांधींवर झाली. यालाच हुकूमशाही म्हणतात”.

(Maharashtra's downfall is due to Delhi's agent Eknath Shinde

हक्कभंग नोटीस कशाबद्दल
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अदानीप्रकरणी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर संरक्षण क्षेत्रातील अनेक कंत्राटे अदानींच्या कंपन्यांनाच मिळतात. मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी देशातील उद्योगजगत त्यांच्या विरोधात होते. मात्र, अदानी मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यावेळी मोदी स्थानिक नेते होते, कालांतराने संपूर्ण गुजरातमध्ये मोदींचा प्रभाव वाढू लागला. नंतर मोदी पंतप्रधान झाल्यावर हे नाते राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहेत”. याबाबत राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने हक्कभंग नोटीस बजावली असून १५ फेब्रुवारीपर्यंत त्या नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले आहे.

मुंबई महापालिका शिवसेनेनकडेच
मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी राजकीय डावपेच आखण्यात आले आहेत. त्याबाबत भाजपच्या कार्यकारिणीत ठरावही पारित करण्यात आले आहेत. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, भाजपाने कितीही ठराव पारीत केले, तरी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच विजय होईल. एकनाथ शिंदेंचा पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्येही समावेश होत नाही. अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जर जर भाजपा लढणार असेल, तर मुंबईच काय कोणत्याच महापालिका निवडणुकीत भाजपचा होणं विजय शक्य नाही, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

हे सुद्दा वाचा

न्यायपालिकाही भाजपच्या मगरमिठीत ; आपल्या मर्जीतल्या न्यायाधीशांना राज्यपाल पदाचे बक्षीस

वारीशेंचा मारेकरी आंबेरकरच्या गाडीवर रिफायनरी कंपनीचा लोगो ; अंगणेवाडी जत्रेत तो कोणत्या नेत्यांना भेटला?

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून वारिशे कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी