33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईमसंदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अन्य दोघांचा शोध सुरू

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अन्य दोघांचा शोध सुरू

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रवक्ता संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला होता. या हल्याचा उलगडा मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या हल्ला प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे, तर अजून दोन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार आहेत. (Sandeep Deshpande attacke The search is on for two others attacker)

संदीप देशपांडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेचे नेते आहेत. भ्रष्टाचारच्या अनेक मुद्यावर ते बोलत असतात. देशपांडे यांच्यावर काल सकाळी शिवाजी पार्क येथे चार जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात संदीप यांच्या हाताला जबर मार लागला आहे. या हल्या नंतर खळबळ माजली होती. याचे पडसाद विधान सभेत ही उमटले होते. यानंतर आज मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने कारवाई केली. क्राइम ब्रांचने या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे. अटक आरोपी यांची नाव अशोक खरात आणि किसन सोलंकी अशी आहेत.

हे सुद्धा वाचा

शरद पवार म्हणाले, देशात बदलाचे वातावरण निर्माण होतयं

खरे तर भ्रष्ट वर्तणुकीसाठी या ४० आमदारांना आत टाकलं पाहिजे

VEDIO : अंबादास दानवे म्हणतात, निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे

या हल्ल्या नंतर आख पोलीस दल कामाला लागल होत. क्राइम ब्रांचने या तपासासाठी आठ टीम बनवल्या होत्या. सीसीटीव्ही आणि इतर टेक्निकल तपासाच्या आधारे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी खरात माथाडी राज्य महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघाचा उपाध्यक्ष आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. भांडुप आणि डोंबिवली येथे हे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात अजून दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.

हा हल्ला का झाला, या मागचं कारण अजून स्पष्ठ झालेलं नाही. या मागे सामाजिक, आर्थिक, राजकीय कारण आहे का या अनुषंगाने तपास सुरू आहे.
– ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबई क्राइम ब्रांच.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी