28 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
घरराजकीयVEDIO : अंबादास दानवे म्हणतात, निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे

VEDIO : अंबादास दानवे म्हणतात, निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे

विधानपरिषदेचे उद्धव ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. धनुष्य-बाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाने बहाल केल्यांनतर खासदार संजय राऊत निवडणूक आयोगावर तोंडसुख घेत आले आहेत. निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुलाम आहे, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनीदेखील केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोग राजकीय मालकांसाठी ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ म्हणून काम करत असल्याचे खोचक टीकास्त्र ‘सामना’मधून सोडण्यात आले आहे. याबाबत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जरी हल्लाबोल केला असला तरी अंबादास दानवे यांनी मात्र त्या गोष्टीचे समर्थन केले आहे. त्यांना याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाची पाठराखण करण्यासाठी सत्ताधारी पक्ष कोणती भूमिका हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे. (Ambadas Danve says Election Commission should be cursed)

पहा VEDIO :

 

हे सुद्धा वाचा

Vedio : येऊरच्या जंगलात २४ तास मिळतेय दारू आणि बाई ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्याचा बिहार झालाय!

VEDIO : संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला का झाला? विधिमंडळातही उमटले पडसाद

रविंद्र धंगेकरांसाठी ‘कामाचा माणूस’ ही ओळख त्यांच्या विजयासाठी मोठा फॅक्टर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी