33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयखरे तर भ्रष्ट वर्तणुकीसाठी या ४० आमदारांना आत टाकलं पाहिजे

खरे तर भ्रष्ट वर्तणुकीसाठी या ४० आमदारांना आत टाकलं पाहिजे

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोर मंडळ’ म्हंटल्यानंतर विधिमंडळात आणि बाहेरही प्रचंड गदारोळ झाला. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विवधकांमध्ये कलगीतुरा रंगला. त्याबाबत संजय राऊत यांच्या विरोधात भाजपकडून हक्कभंगदेखील दाखल करण्यात आला. त्यांच्या या विधानाबाबत संजय राऊत यांनी पुन्हा आपली भूमिका स्प्ष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी आधी स्वतःचे अंतरंग तपासावं, खरं तर भ्रष्ट वर्तणुकीबद्दल हे सर्व आमदार आत जायला पाहिजे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे. (In fact, these 40 MLAs should be put behind bar for corrupt behavior)

ते म्हणाले, “मी विधिमंडळाचा पूर्णपणे आदर करतो. माझं ते विधान एका विशिष्ट गटाला अनुसरून होतं, हे सर्वांनाच माहिती आहे. विशिष्ट फुटीर गटाला उद्देशून मी ते विधान केलं होतं. मी विधिमंडळ आणि संसदेबाबत अशा प्रकारे बोलू शकत नाही, कारण मी त्या सभागृहाचा सदस्य आहे. कायदा, संविधान, घटना, नियम यांचं महत्त्व मलाही माहिती आहे.”
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “विधिमंडळाच्या अवमानाप्रकारणी संजय राऊत यांनी आपण विधिमंडळ आणि संसदेबाबत बोलू शकत नाही. शरद पवार यांनीदेखील याबाबत भाष्य केले आहे.”

या प्रकरणी संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली असून अद्यापही संजय राऊत यांनी त्यावर उत्तर दिले नाही. त्यामुळे राऊत यांना अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनीही केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, “शिंदे गटाच्या आमदारांनी माझ्या अटकेची मागणी केली असेल, तर होऊन जाऊ द्या. कायदा, न्यायालय, पोलीस पूर्णपणे खोक्याखाली चिरडलेले नाहीत. अद्यापही काही रामशास्री जीवंत आहेत. ४० आमदारांनी आधी स्वत:चं अंतरंग तपासावं. खरं तर करप्ट प्रॅक्टिसचा वापर केल्याबद्दल या सर्व आमदारांना तुरुंगात टाकले पाहिजे.”

हे सुद्धा वाचा

VEDIO : अंबादास दानवे म्हणतात, निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे

कुचकामी फडणवीसांपेक्षा बच्चू कडूंना गृहमंत्री करा; सुषमा अंधारे यांची टीका

संजय राऊतांना परिणाम भोगावे लागतील; अब्दुल सत्तारांचा इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी