27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeक्राईमभयंकर : गुणपत्रिका दिली नाही म्हणून प्राचार्याला पेट्रोल टाकून पेटवले

भयंकर : गुणपत्रिका दिली नाही म्हणून प्राचार्याला पेट्रोल टाकून पेटवले

प्राचार्य विमुक्ता शर्मा (५०) या दुर्घटनेत ८० % भाजल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुणपत्रिका देण्यास विलंब करत असल्याच्या रागातून एका माजी विद्यार्थ्याने बीएम फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याची भयंकर घटना सोमवारी मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. बीएम फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य विमुक्ता शर्मा या दुर्घटनेत ८० टक्के भाजल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशुतोष श्रीवास्तव असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तोदेखील या घटनेत ४० टक्के भाजला आहे. मध्यप्रदेशमधील सिमरोलच्या सीमेवरील बीएम फार्मसी महाविद्यालयात ही घटना घडली आहे. (The principal was doused with petrol and set on fire for not giving the mark sheet)

संध्याकाळी सुमारे ४.०० वाजण्याच्या सुमारास प्राचार्य विमुक्ता शर्मा या घरी जाण्यासाठी आपल्या गाडीत बसत असताना आशुतोष श्रीवास्तवने त्यांना हटकले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने प्राचार्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्राचार्या स्वत:चा जीव वाचवण्यासाठी महाविद्यालयाच्या इमारतीकडे धावल्या, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. विमुक्ता शर्मा बोलण्याच्या अवस्थेत नव्हत्या. आशुतोष श्रीवास्तवला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. (Police arrested accused) यावेळी आशुतोषच्याही हाताला इजा झाली आहे, असे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) भागवत सिंग वीर्दे यांनी पीटीआयला सांगितले.

प्राचार्य विमुक्ता शर्मा यांना पेट्रोल ओतून पेटवल्यानंतर आशुतोषने त्याच परिसरात असलेल्या तींचा धबधब्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाचवण्यात आले आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आशुतोष सातव्या सत्रात नापास झाला होता. आठव्या सत्रात त्याने परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला होता. पण त्याला त्याची गुणपत्रिका मिळाली नव्हती. त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

पाच महिन्यांपूर्वीही हल्ल्याप्रकरणी अटक
आशुतोष श्रीवास्तव याने पाच महिन्यांपूर्वीही बीएम फार्मसी महाविद्यालयातील एका शिक्षकावर चाकूने हल्ला केला होता. त्याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. त्याला काही आठवड्यांपूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे गटातील आमदाराचा सोनू निगमवर हल्ला

आताच जागे व्हा, अन्यथा २०२४ नंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरु होईल !

आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, प्रकाश आंबडेकर यांची ग्वाही

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी