33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईनागपुरात साकारणाऱ्या जगातील पहिल्या सर्वसमावेशी दिव्यांग उद्यानाची नितीन गडकरींच्या हस्ते पायाभरणी

नागपुरात साकारणाऱ्या जगातील पहिल्या सर्वसमावेशी दिव्यांग उद्यानाची नितीन गडकरींच्या हस्ते पायाभरणी

नागपूर शहर हे देशातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. 2016 मध्ये केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांसाठी दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायदा संमत केला. या कायद्यामुळे दिव्यांगांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. याअंतर्गत केंद्र सरकारने पुढाकार घेऊन दक्षिण भारत आणि मध्य प्रदेशात काही दिव्यांग पार्कची निर्मिती केली आहे.

या मालिकेत नागपूरच्या पारडी परिसरात दिव्यांग मुलांसाठी आण सर्वसामान्य नागरिकांसाठी हे ‘अनुभूती समावेशी पार्क’ उभारले जात आहे. नागपूरच्या पारडी परिसरात 90 हजार चौरस फुट जागेवर दिव्यांगांसाठी अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क बनवला जात आहे. तब्बल 12 कोटी रुपये खर्चून तयार होणारा या प्रकारचा हा पहिलाच पार्क असणार आहे. या पार्कचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात आले. या पार्कचा उपयोग दिव्यांगांसोबतच सर्वसामान्य व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकसुद्धा करू शकणार आहेत. (world’s first inclusive disabled park)

विशेषतः जगातील सर्वात मोठ्या आणि अद्वितीय अशा या दिव्यांग पार्कची पायाभरणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक समाज घडवण्याच्या संकल्पनेतून हे पार्क विकसित केले जाणार आहे. या पार्कमध्ये सहानुभूती नव्हे तर सह अनुभूतीचे दर्शन घडेल म्हणूनच त्याचे नामकरण अनुभूती दिव्यांग पार्क असे करण्यात आले आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, माजी मंत्री सुलेखा कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या पार्कमध्ये दिव्यांगांसाठी 21 प्रकारच्या सुविधा असून टच अँड स्मेल गार्डन, हायड्रोथेरपी युनिट, वॉटर थेरपी अशा विविध सुविधांचा समावेश असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वस्पर्शी धोरणानुसार हा पार्क विकसित केला जाणार असून त्याचे नामकरण अनुभूती दिव्यांग पार्क असे करण्यात आले आहे.

नागपुरात साकारणाऱ्या जगातील पहिल्या सर्वसमावेशी दिव्यांग उद्यानाची नितीन गडकरींच्या हस्ते पायाभरणी
छायाचित्र सौजन्न-गुगल: नागपुरात साकारणार जगातील पहिले समावेशी दिव्यांग उद्यान ; पायाभरणी करताना मंत्री नितीन गडकरी
नागपुरात साकारणाऱ्या जगातील पहिल्या सर्वसमावेशी दिव्यांग उद्यानाची नितीन गडकरींच्या हस्ते पायाभरणी
छायाचित्र सौजन्न-गुगल: मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केल्यानंतर नागपूरच्या स्थायी आजींसोबत त्यांचे हेवा वाटणारे क्षण

या पार्कच्या माध्यमातून केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात सर्वसमावेशकतेचा संदेश पोहचेल. या पार्कमध्ये सर्व 21 प्रकारच्या दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा असतील, यामध्ये स्पर्श आणि गंध उद्यान, हायड्रोथेरपी युनिट, वॉटर थेरपी, मतिमंद मुलांसाठी आणि त्यांच्या मातांसाठी स्वतंत्र खोली, अशा सुविधा असतील.

हे सुद्धा वाचा : राज्यातील दिव्यांगांचे होणार सर्वेक्षण; महामंडळाला ५०० कोटींचे भागभांडवल, कर्जवाटप होणार

परदेश नव्हे; हे तर आपले विरार : नितीन गडकरींनी शेअर केले दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे फोटो; 12 तासात प्रवास सुसाट!

High Court News : अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी मुंबई उच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी