33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईतुकाराम मुंडेंना मुंबई मनपाच्या आयुक्तपदी घेण्याची मागणी

तुकाराम मुंडेंना मुंबई मनपाच्या आयुक्तपदी घेण्याची मागणी

टीम लय भारी

मुंबई : तुकाराम मुंढे हे प्रशासकीय सेवेतील एक ते नाव आहे जे कायमच आपल्या कामगिरीमुळे चर्चेचा विषय ठरलेले आहेत. त्यांनी कायमच अवैध धंदे आणि अतिक्रमणांवर थेट कारवाई केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी लोकांचा कर्दनकाळ अशी ओळख देखील त्यांना लोकांनी दिली. म्हणून अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्याला आता भाजप-शिंदे सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सुधीर लक्ष्मीकांत दाणी यांनी याबाबतचे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुकाराम मुंढे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करून कारभार पारदर्शक करण्याची मागणी केली आहे. भाकपच्या अनेक नेत्यांनी किंबहुना खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाजप-सेना युती संपुष्टात आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्टाचारावर सातत्याने प्रहार केला आहे.

तुकाराम मुंडेंना मुंबई मनपाच्या आयुक्तपदी घेण्याची मागणी

आता तर भाजप शिवसेनेतील शिंदे गटाला घेऊन सत्तेत बसले आहेत. त्यामुळे आता भाजपला मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराला खऱ्या अर्थाने आळा घालायचा असेल तर, त्यांनी मुंबई मनपाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नेमणूक कारवाई. तसेच मुंबई महानगरपोलिकेचा कारभार वेबसाईट किंवा अॅपच्या माध्यमातून करदात्या नागरिकांसाठी खुला करावा, असेही या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे.

तुकाराम मुंडेंना मुंबई मनपाच्या आयुक्तपदी घेण्याची मागणी

कोणत्याच नेत्याला किंवा कोणत्याच राजकीय पक्षाला पारदर्शक कारभार नको असतो, हे देखील त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. म्हणून या सोशल मीडियावरील पत्रामुळे सत्तेत बसलेल्यांवर नेमका काय परिणाम होतो ? हे पाहावेसे लागणार आहे. खरंच पारदर्शक कारभार करण्यासाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका पारदर्शी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्याची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करतात का? हे पाहावे लागणार आहे.

 

हे सुद्धा वाचा :

नामांतरणाच्या मुद्द्याला भाजप-शिंदे सरकारने दिली मंजुरी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप

भाजप नेत्यानेच ‘मोदीभक्तां’ची केली चंपी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी