31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयधनंजय मुंडे नावाचा झंझावात...!

धनंजय मुंडे नावाचा झंझावात…!

शुभम तांदळे

गेल्या अनेक अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात परळी राज्याच्या राजकारणात महत्वाच्या ठिकाणी राहिली. परळी ने अनेकदा राज्यालाच नव्हे तर अधून मधून दिल्लीच्या तख्ताला सुद्धा धक्के दिले. अनेकांच्या साम्राज्याला सुरुंग लावून गोपीनाथ रावजी मुंडे नावाचे वादळ गेली अनेक दशके तुफान घोंगावत राहिले (Dhananjay Munde has been raging for decades).

शेटजी अन भटजीचा पक्ष म्हणून हिनवले गेलेल्या भाजपाला खऱ्या अर्थाने वाडी, वस्ती, तांड्यावर पोहचवण्याचे काम मुंडे साहेबांनी केले. केंद्रात प्रमोद जी अन राज्यात गोपीनाथजी हे समीकरण पक्के जुळले होते. मुंडे साहेब संबंध महाराष्ट्राचे राजकारण करत असताना त्यांच्या होम ग्राउंडवर त्यांचे बंधू पंडित अण्णा मुंडे यांनी भर भक्कम साथ दिली.

धनंजय मुंडेंच्या कामाचा झपाटा, मध्यरात्रीही जनतेचे सोडविले प्रश्न

धनंजय मुंडेंनी शब्द दिला होता, तो पाचच दिवसांत पूर्ण केला

पण हे सगळे घडत असताना मुंडे परिवारात धनंजय मुंडे नावाचे नवे नेतृत्व बाळसे धरायला लागले होते. गोपीनाथ मुंडे साहेब, पंडित अण्णा पाठोपाठ धनंजय मुंडे ही हळूहळू तालुक्याच्या, जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय व्हायला लागले होते. गोपीनाथ मुंडे साहेब राज्यात अन धनंजय मुंडे साहेब हे तालुक्यातील गोष्टी सांभाळून त्यांना चांगली साथ द्यायला लागले होते.

नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडे हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात सक्रिय व्हायला लागले. त्यांच्यातील नेतृत्व गुण भारतीय जनता पक्षाने बघितले, गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यांना हळूहळू राज्याच्या राजकारणात संधी दिली. भाजपच्या युवा मोर्च्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे देखील कमी अधिक प्रमाणात राज्यात सक्रिय व्हायला लागले. त्याचवेळी स्थानिक राजकारणात ही त्यांची घट्ट पकड बसली होती (At the same time, he had a strong grip on local politics).

गोपीनाथ मुंडे साहेब ही हळूहळू दिल्लीच्या राजकारणात सक्रिय व्हायला लागले. सगळे व्यवस्थित चालू असताना शेवटच्या काही काळात मात्र ज्युनिअर मुंडे अन सिनिअर मुंडे यांच्यात सगळेच आलबेल नसल्याचा प्रत्यय यायला लागला. मुंडे साहेब लोकसभेत गेल्यानंतर विधानसभेच्या वेळी परळीतून धनंजय यांच्या ऐवजी पंकजा ताई यांना संधी देण्यात आली.

जयंत पाटलांनी धनंजय मुंडेंचे केले कौतुक

Dhananjay Munde suffers setback as his upward surge halted by controversy

धनंजय मुंडे हळूहळू वेगळा विचार करू लागले. बऱ्याच दिवस धुसफूस चालू असताना धनंजय मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँगेसची वाट धरली. यात खरं कारण काय? चूक कोणाची? कशामुळे मुंडे कुटुंब फुटले हे अधिक फक्त मुंडे कुटुंबियांनाच माहीत पण धनंजय मुंडे यांनी थेट राष्ट्रवादीची वाट धरणे हा मुंडे साहेबांनाच नव्हे तर त्यांच्या लाखो समर्थकांना, अनेकांना मोठा धक्का होता (Dhananjay Munde direct wait for the NCP was a big shock not only to Munde Saheb but to millions of his supporters many).

धनंजय मुंडे यांच्या मनात ही डावलल्याची भावना असेल किंवा अनेक दिवसांची इतर काही राजकीय खदखद असेल..! बीड जिल्ह्यातील, बाहेरील मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग धनंजय यांच्यावर नाराज झाला. ज्या मुंडे साहेबांनी शरद पवारांशी संघर्ष केला त्यांच्या कळपात जाणे हे अनेकांना खटकले असले तरी स्थानिकचे काही अन इतर काही जिवलग धनंजय मुंडे यांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. बंड केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळीची नगर परिषद गोपीनाथ मुंडे यांच्या हातातून काढून घेत राष्ट्रवादीच्या ताब्यात नेऊन दाखवली.

तसे असले अनेकांसाठी धनंजय मुंडे हे खलनायक झाले. अनेकांनी त्यांना शिव्यांची लाखोळी वाहिली. पुढे अनेक छोट्या मोठ्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. भगवान गडावर एकदा त्यांच्या ताफ्यावर दगड फेक ही झाली. पण धनंजय मुंडे हे सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्यात तालमीत तयार झालेले होते. त्यांना जवळच्या साथीदारांना घेऊन काम करायचा धडाका लावला.

त्यातच पुढे राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर घेऊन विरोधी पक्षनेते पदावर काम करण्याची संधी दिली. नेमके याच संधीचे सोने करत धनंजय मुंडे यांनी लोकांची काम करत लोकांची मने जिंकायला सुरूवात केली. त्यांच्या कामाची प्रगती पाहून शरद पवारांनी त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली.

Dhananjay Munde has been raging for decades
धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी ही आपल्या अभ्यासू, आक्रमक भाषणातून सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर ही आपली छाप सोडली. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या तुलनेत धनंजय मुंडे यांचे काम उठून दिसायला लागले. त्यांनी अनेकदा सरकारला अनेक मुद्यांवर कोंडीत पकडले. आपल्या भाषणांचा धडाका लावत सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. स्थानिक पातळीवर परळी मतदारसंघात ही चांगल्या प्रकारे संपर्क ठेवला.

धनंजय मुंडे यांना मुंडे हे आडनाव सहज मिळाले असले तरी पुढे त्यांना मिळालेले अनेक पदे हे त्यांना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करूनच मिळवावे लागले किंवा मिळाले आहेत. अनेक दिवस सतत पराभव पाहत राहिलेले धनंजय मुंडे हे पुढे नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा अशा निवडणुकात विजयी होत गेले. त्यांच्या वर झालेल्या कडव्या टीकेचा त्यांनी अत्यंत संयमाने सामना केला.

महादेव जानकर यांनी त्यांच्यावर भगवान गडावरून केलेल्या जहरी टीकेला देखील त्यांनी अत्यंत संयमाने हाताळले. प्रमोद महाजन साहेबांच्या भाषणाचा पगडा मानल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद ते राज्याच्या कॅबिनेट मंत्री असा खडतर प्रवास विरोधी पक्षनेते पदाच्या मार्गाने अन बारामतीच्या आशीर्वादाने, सहकार्याने सुसह्य केला. येणाऱ्या काळात ही ते अनेक महत्त्वाच्या पदावर दिसतील यात शंका नाही.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी