26 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeराजकीयफेसबुकवर धनंजय मुंडे आघाडीवर, पंकजा मुंडे पिछाडीवर

फेसबुकवर धनंजय मुंडे आघाडीवर, पंकजा मुंडे पिछाडीवर

टीम लय भारी

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नेहमीच राजकीय तणाव पाहायला मिळतो. मात्र टीम ‘लय भारी’ने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या फेसबुकवरील व्हिडिओची तुलना केली होती. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही नेत्यांनी फेसबुकवरून भाषण केले होते. परंतु, या सगळ्यात जास्त फेसबुकवरील दर्शक हे धनंजय मुंडेंच्या व्हिडीओवर पाहायला मिळाले (Dhananjay Munde is in the lead, Pankaja Munde is in the back on Facebook).

दसरा मेळाव्याला जवळपास २४ तास उलटून गेले असले तरी पंकजा मुंडे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरील भाषणाच्या व्हीडीओला ३३ हजार लोकांनी पहिले आहेत. तर धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला फेसबुकवर २२ तासांमध्ये १ लाख ७५ हजार लोकांनी पहिले आहे.

देवेंद्र फडणवीस ‘क्लीन चीट मास्टर’, भुजबळांची सडकून टीका

ती लेडी डॉन कोण?, बॉलिवूड आणि तुमच्याशी कनेक्शन काय?; नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना सवाल

Dhananjay Munde is lead, Pankaja  is in the back on Facebook
धनंजय मुंडे फेसबुक पेज
 Dhananjay Munde is lead, Pankaja  is in the back on Facebook
पंकजा मुंडे फेसबुक पेज

विविध वृत्तवाहिन्यांचे पोर्टल्स, फेसबुक पेज, युट्युब चॅनल्स असा आणखी सविस्तर सर्व्हे केला असता धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेला 22 तासात जवळपास 11 लाख (1.1M Views overall) लोकांनी पाहिले आहे तर पंकजाताई मुंडे यांच्या भाषणाला एकूण समाज माध्यमांमध्ये 4 ते 4.5 (400 to 450K Views overall) लाख लोकांनी पाहिले आहे. यातून समाजमाध्यमांध्ये जास्त पसंती धनंजय मुंडे यांना मिळत असल्याचे दिसून येते.

दरम्यान पंकजाताई मुंडे यांनी ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे काम ‘हवे’ तसे करता आले नाही असे म्हणत आपल्या अपयशाची एकप्रकारे कबुली देणे आणि आपल्या पक्षातील नेते मंडळींना सरकार पाडण्याच्या गोष्टी बंद करा, असा घरच्या आहेरवजा सल्ला दिल्याने विरोधकांसह स्वकीयांकडूनही पंकजा मुंडे यांना ट्रोल करण्यात येत आहे.

मी येणारच, पण ते येणारच हे त्यांना काही जमेना : शरद पवार

‘Fletcher Patel and his lady don’: NCP’s Nawab Malik fires another salvo against NCB, Sameer Wankhede

तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामाला आपण गती दिली असून, आता ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामाला गती मिळत असून कामगारांची नोंदणी करत ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगितले.

दसरा मेळाव्यातील भाषणादरम्यान व्यसनमुक्ती बाबत गावोगाव काम करणार असल्याच्या पंकजताईंच्या घोषणेचे सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्याने आपण स्वागत करतो व त्यांचे या कामासाठी आभार मानतो असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्यातील समंजसपणा तर दाखवून दिलाच आहे तसेच त्यांचे हे सकारात्मक राजकारण सिद्ध करणारे वक्तव्य चर्चेचा विषय देखील बनले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी