30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयभाजपाच्या प्रामाणिकपणाला अजितदादांचे सर्टीफिकेट

भाजपाच्या प्रामाणिकपणाला अजितदादांचे सर्टीफिकेट

शिवसेनेला कधीही दूर करणार नाही असे भाजपने शरद पवारांना सांगितल्याने शरद पवारांनी २0१७ ला भाजपबरोबर जाणे टाळले. भाजपला शिवसेनेची युती कधीच तोडायची नव्हती असे भाजपच्या प्रामाणिकपणाचे सर्टीफीकेटच अजित पवार यांनी दिले. अर्थात युती तोडण्याचे पाप हे शिवसेनेच्या माथी फोडण्याचे यात धोरण असू शकते.

शिवसेनेला कधीही दूर करणार नाही असे भाजपने शरद पवारांना सांगितल्याने शरद पवारांनी २0१७ ला भाजपबरोबर जाणे टाळले(relation between ajit pawar and bjp). भाजपला शिवसेनेची युती कधीच तोडायची नव्हती असे भाजपच्या प्रामाणिकपणाचे सर्टीफीकेटच अजित पवार यांनी दिले. अर्थात युती तोडण्याचे पाप हे शिवसेनेच्या माथी फोडण्याचे यात धोरण असू शकते. पण यात फार मोठे सत्य दडलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सतत भाजपबरोबर जाण्यासाठी दरवाजे ठकठक करत होती. चिऊताई चिऊताई दार उघड म्हणत शरद पवार भाजपच्या दारात जात होते. पण भाजप थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते या प्रमाणे चिमणीचा कावा करत शिवसेनेला जपत होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील कोकीळेचीअंडी मात्र भाजपरुपी कावळ्याच्या घरट्यात आहेत का?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी