30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमंत्रालयपीडब्ल्यूडी भ्रष्टाचार : फडणवीस सरकारने 90 कोटींची खोटी बिले अडवली, ठाकरे सरकारने...

पीडब्ल्यूडी भ्रष्टाचार : फडणवीस सरकारने 90 कोटींची खोटी बिले अडवली, ठाकरे सरकारने ती ‘कोरोना’ काळात मंजूर केली

टीम लय भारी

मुंबई : सावर्जनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी) भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध आहे. परंतु भ्रष्टाचाराचा कळस करणारा प्रकार पीडब्ल्यूडीने केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले ( Atul Bhatkhalkar exposed PWD scam in Vidhansabha ).

सन 2007 ते 2015 या काळात मुंबईतील अधिकाऱ्यांनी बोगस बिले तयार केली होती. हा खोटा प्रकार फडणवीस सरकारच्या लक्षात आला. त्यामुळे फडणवीस सरकारने या बिलांना मंजुरी दिली नाही. परंतु नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ‘कोरोना’ काळात या बिलांना मंजुरी दिली. तब्बल 90 कोटी रुपयांची ही बिले आहेत ( Atul Bhatkhalkar said, Mahavikas Aghadi government sanctioned bogus bills ).

हे सुद्धा वाचा

‘शहरातही रोजगार हमी योजना सुरू करा’

भाजपची ‘महाविकास आघाडी सरकार’ विरोधात जंगी मोहीम

मंत्र्याकडे 42 वेळा जाऊनही भेट नाही, सत्ताधारी आमदाराला मिळाला कटू अनुभव

कृषी मंत्री शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत, आमदार पाटील दादा भुसेंवर संतापले

https://www.livemint.com/news/india/maharashtra-fadnavis-alleges-corruption-in-covid-19-management-11614687248508.html

Record corruption in the name of handling Covid in Maharashtra, alleges Fadnavis

मुंबईतील प्रेसिडेन्शी इलाख्यात अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केल्याचे त्यांनी सांगितले. प्रेसिडेन्शी विभागात गाड्यांचा दुरूस्ती व देखभालीचीही खोटी बिले तयार केल्याचे भातखळकर यांनी सांगितले (Atul Bhatkhalkar slammed to PWD officers ). चंद्रकांत नाईक नावाचे नांदेडचे अधिकारी कोण आहेत, असाही सवाल भातखळकर यांनी केला.

लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने एका कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर धाड टाकली. तो अधिकारी पळून गेला. पण त्याच्या सरकारी कपाटात 16 लाख रुपये सापडले. घरी 50 लाख रुपयाच्या वर रक्कम सापडल्याचाही आरोप भातखळकर यांनी केला ( Atul Bhatkhalkar said, huge money found in PWD officers office).

Char Dham

पीडब्ल्यूडीचे अधिकारी 2 टक्के, 10 टक्के असे कमिशन घेतात. गोरगरीबांच्या योजनांवर सरकार खर्च करीत नाही. परंतु 2007 पासूनच्या खोट्या बिलांना ‘कोविड’च्या काळात मंजुरी दिली जाते. याची सरकारला लाज वाटली पाहीजे, असाही आरोप भातखळकर यांनी केला ( Atul Bhatkhalkar fired on Uddhav Thackeray Government ).

भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवरही हल्लाबोल केला. तुम्ही गृहमंत्र्यासारखे वागा. राजकारण्याप्रमाणे वागणारा गृहमंत्री आतापर्यंत महाराष्ट्राला मिळाला नव्हता. तुम्ही माझी चौकशी करा. भाजपच्या नेत्यांची चौकशी करा. भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांपर्यंत चौकशी करा. आम्हाला काही फरक पडणार नाही. पण तुमच्या गृहखात्यात भ्रष्टाचार माजला आहे. बदल्यांसाठी पैसे घेतले जातात. राज्यात खून, बलात्कार होत आहेत. त्याकडेही गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असा टोला भातखळकर यांनी लगावला ( Atul Bhatkhalkar slammed to Anil Deshmukh ) .

Appeal

हे सुद्धा पाहा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी