29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयमहिला दिवस विशेष : पटडीबाहेर जाऊन समाजासाठी झटणारी रणरागिणी

महिला दिवस विशेष : पटडीबाहेर जाऊन समाजासाठी झटणारी रणरागिणी

रसिका जाधव

महिलांनी स्वतः चे निर्णय स्वतः घ्यावेत. जरी एखादा निर्णय चुकाला तरी न डगमगता नव्याने सुरूवात करावी. लगेच खचून जाऊ नये आणि नैराश्य आले म्हणून कोणते ही चुकीचे पाऊल उचलू नये. महिलांनी कोणत्याही गोष्टीसाठी कोणावर अवलंबुन राहू नये. महिलांनी स्वत:ला कधी ही कमी लेखू नये, असं मत मुख्याध्यापिका संध्या चौगले यांनी व्यक्त केलं.

सातारा जिल्ह्यातील पुसेगावातील श्री. सेवागिरी विद्यालयाच्या मुख्यध्यापिका शिक्षिका संध्या चौगुले या आर्दश शिक्षका आहेत. परंतु या फक्त शिक्षिकाच नसून त्या समाजसेविका देखील आहेत. संध्या चौगुले यांना लोकांनी त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणखी वेगवेगळी नावे दिली आहेत म्हणजेच त्यांच्या कामातून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. काही लोक त्यांना झाडलावणारी बाई, झाडूवाली बाई तर काही लोकांनी चुलवीली बाई अशी अनेक नावे दिली आहेत. मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांना त्यांच्या सामाजिक कार्यामुळे एकूण १३ वेगवेगळे पुरस्कार देखील मिळाले आहेत. संध्या चौगुले यांनी विद्यार्थां सोबत त्यांच्या पालकांचे मन देखील जिंकले आहे. खेडोपाड्यातून काम करताना आणि झाडे लावत असताना आलेल्या अनुभवावर हिरवाईच्या कविता नावाचा कविता संग्रह देखील लिहिला आहे.

कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु ग्रामीण भागात ऑनलाईन शाळा घेणे हे ग्रामीण शाळेतील शिक्षकांसाठी एक आव्हान होते. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थांची परिस्थिती ही हालाकीची असते म्हणजेच हातावरचे पोट अशी असते. अशातच त्या लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल फोन नसतात. मग तेव्हा शिक्षण घेणे कठीण होते. परंतु चौगुले मॅडमच्या शाळेत या अडचणी आल्या नाहीत कारण त्यांनी अडीच वर्षापूर्वी विद्यार्थाच्या पालकांसोबत व्हॉटसअप गृप तयार केले होते. त्यामुळे त्यांना ऑनलाइन शाळा घेणे कठीण नव्हते. परंतु त्यांच्या संपूर्ण शाळेतील १३ तुकड्या आहेत त्यात एकूण ७५० विद्यार्थी आहेत त्यापैकी ०७ विद्यार्थी असे होते की, त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही परंतु त्या विद्यार्थासाठी मॅडमने वेगळ्या प्रकारे शिकवण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्यांना पुस्तक दिली होती. ती पुस्तके वाचून विद्यार्थांना काही अडचणी आल्या की, मग त्या अडचणी शिक्षक फोन करून त्यांच्या अडचणी दूर करत होते. कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थांचे नुकसान होऊ नये आणि ते शिक्षणापासून वंचित राहू नये हाच मॅडमचा आणि त्यांच्या शाळेतील शिक्षकांचा प्रमुख हेतू होता.

कोरोनाचा प्रसार कमी झाला म्हणून ऑफलाईन शाळा सुरू झाल्या. तेव्हा १२ फेब्रुवारीला नेरे गावातील एका कुटुंबातील सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्या कुटुंबातील एक मुलगी मॅडमची विद्यार्थीनी होती. परंतु ती दोन दिवस शाळेत आली होती. त्यामुळे त्या मुलीला शाळेतून सुट्टी दिली. परंतु त्यानंतर शाळेने प्रत्येक मुलीची आरटीसीआर चाचणी करायला सुरूवात केली. त्यानंतर शाळेत २५ विद्यार्थींना कोरोनाची लागण झाली होती. ते २५ विद्यार्थी आणि ती मुलगी अशी एकूण २६ विद्यार्थींना कोरोनाची लागण झाली होती. मग तेव्हा मॅडम आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी मोठा पुढाकर घेतला होता तो म्हणजे ज्या विद्यार्थांला कोरोनाची लागण झाली आहे त्या विद्यार्थांना स्व:ताच्या घरात विलगीकरण करून ठेवणे. परंतु काही विद्यार्थींची घर लहान होती मग तेव्हा त्या विद्यार्थांचे विलगिकरण करणे घरात शक्य नव्हते मग तेव्हा त्यांचे विलगिकरण हे रुगणालयात करण्यात आले. तेव्हा मॅडम आणि शिक्षक हे स्वत: त्या मुलांची चौकशी करण्यास जात होते. तेव्हा चौगुले मॅडम आणि इतर शिक्षक यांच्याकडे कोणते ही पिपिकिट नव्हते तरी ते कोरोना झालेल्या विद्यार्थांची काळजी घेत होत्या. हे सर्व करताना त्यांनी सरकारने दिल्या सर्व नियमांचे पालन करत विद्यार्थांची काळजी घेतली होती. विद्यार्थांची काळजी घेत असताना त्यांच्या पालकांना देखील आरटीसीआर चाचणी करण्यास सांगितले. विद्यार्थांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून देखील चौगुले मॅडम आणि इतर शिक्षकांनी काळजी घेतली. परंतु २६ विद्यार्थांच्या कुटुंबातील फक्त दोन लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यांचे सर्व श्रेय चौगुले मॅडम आणि त्याच्या शिक्षक करमचाऱ्यांना जाते आहे. त्यांनी जर या सर्व गोष्टीची काळजी घेतली नसती तर हा आकडा वाढला असता परंतु त्यांनी वेळीच दक्षता घेतल्यामुळे हा अकडा दोन वर येऊन थांबला. चौगुले मॅडच्या निर्णयामुळे गावाचे संरक्षण झाले.

चौगुले मॅडम यांनी विद्यार्थांसाठी नवनविन उपक्रम सुरू केले. दिवाळीला फटाकेमुक्त दिवाळी असा उपक्रम सुरू केला. ज्या विद्यार्थांनी एक ही फटाका फोडला नाही अशा विद्यार्थांचे शाळेत सत्कार केला गेला. विद्यार्थांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. विद्यार्थांना सांगितले की, फटाके की पुस्तके असे त्यांना सांगितले होते म्हणजे फटाकांनी काय होते आणि पुस्तकांनी काय होते. फटाके पैसे जाळतात तर पुस्तक आयुष्य घडवतात. रक्षाबंधनला झाडांना राखी बाधण्याचा उपक्रम सुरू केला. तेव्हा मॅडमने वृक्षाचे महत्त्व विद्यार्थांना पटवून दिले. त्यांनी विद्यार्थांना सांगितले की, झाडात सुध्दा जीव असतो त्याला सुध्दा वेदना होता. विद्यार्थांना देखील त्यांच्या अंगणता किंवा परस दारात झाडे लावण्यास सांगितली. शाळेत देखील झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला. विद्यार्थांना वाचणाचे महत्त्व पटवून दिले. वाचनाने माणसे घडतात. माणसे समृध्द होतात तसेच पुस्तक वाचल्यामुळे समाज घडतो.

खेड्यातून काम करताना तेथील प्रत्येक बाईला ग्राम सुधारणेच्या सर्व उपक्रमांमध्ये सामील करून घेतले. त्यातून मिळवलेल्या सहभागातून ६५ गावांमध्ये दोनशेहून अधिक बचतगट स्थापन केले. शेळीपालन,  म्हैशीपालन,  फूल उत्पादन अशा शेतीला पूरक उद्योगातून स्वतःचे असे अर्थार्जन झाल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढली आणि अशा अनेक स्त्रियांच्या सहभागातून गावांमध्ये टिकाऊ, शाश्वत स्वरूपाचे परिवर्तन झाले.

सन २००१ पासून सातारा शहराजवळच्या कातकरी वस्तीमध्ये सातत्याने काम करत आहे. साधारणपणे ४०० लोकसंख्येच्या या वस्तीमध्ये प्रामुख्याने एन. एस. एस. कॅम्प आणि सलग आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि उदरनिर्वाहाची साधने याविषयी मोठ्या प्रमाणात जागृती केली. गोवर, कुपोषण यामुळे होणारे बालमृत्यू आटोक्यात आणले. तेथील महिलांच्या सहभागाने व्यसने, जुगार कमी करून तीन बचत गट स्थापन केले शिक्षणाचा गंध नसलेल्या या वस्तीतील मुले आता शाळेत जाऊ लागली आहेत.

सातारा जिल्ह्यातील पस्तीस शाळांना सहभागी करून घेतले. त्या शाळेतील शिक्षकांना ई- कचऱ्याविषयी माहिती देण्यासाठी चार कार्यशाळा घेतल्या. या शिक्षकांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत ई-कचरा आणि त्याचा आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होणारा घातक परिणाम याबद्दल जागरुकता निर्माण केली. या शाळांच्या माध्यमातून हजारो टन ई-कचरा गोळा केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी