33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeएज्युकेशनAurangabad News : औरंगाबादच्या शाळेत भरली 'भाकरी' बनवण्याची स्पर्धा

Aurangabad News : औरंगाबादच्या शाळेत भरली ‘भाकरी’ बनवण्याची स्पर्धा

औरंगाबादच्या दोन जिल्हा परिषदेच्या शाळांनी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. ज्यात भाकरी करण्याची आणि कपडे धुण्याची स्पर्धा घेण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेनंतर मुलांना आईच्या कामांचा महत्व कळाले.

आपल्या घरात आपली आई घरातील कामे नियमितपणे करत असते. आई कधीच या कामांचा कंटाळा करताना दिसत नाही. विषेश म्हणजे शारीरिक कस लावणारी ही कामे न करण्यासाठी आई कधीही कारणे देताना दिसत नाही. आणि कदाचित त्यामुळेच अनेकांना आई करत असलेल्या कष्टाची जाणीव नसल्याचे दिसून येते. याच आईचे आणि ती करत असलेल्या कष्टाची जाणीव व्हावी यासाठी औरंगाबादेच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सध्या शाळेतील या उपक्रमाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. औरंगाबादच्या दोन जिल्हा परिषदेच्या शाळांनी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. ज्यात भाकरी करण्याची आणि कपडे धुण्याची स्पर्धा घेण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेनंतर मुलांना आईच्या कामांचा महत्व कळाले.

औरंगाबादयेथील वंदनाच्या ज्ञानेश विद्यामंदिर आणि गंगापूरच्या गाजरमळा जिल्हा परिषद शाळेत या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्रशासनाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत विद्यार्थीदेखील नमोठ्या उत्साहात सामील झाले. अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेदरम्यान चूल मांडण्यापासून गोलगोल भाकऱ्या थापण्यापर्यंंतची सर्व कामे स्वताहून केली. यावेळी भाकरी बनवत असताना अनेक मुलांच्या हाताला चटके लागले. मात्र, या चटक्यांनी या लहान मुलांना आईच्या कष्टाची जाणीव करून दिली.

हे सुद्धा वाचा…

Monsoon Alert : बाबो! भारतात ‘या’ ठिकाणी पावसाचे थैमान; नागरिकांसाठी हाय अलर्ट

Mumbai Police : मुंबईच्या माजी आयुक्तांना सीबीआयकडून अटक, वाचा काय आहे प्रकरण

IND vs AUS T20I : सिरीज डिसाईडरमध्ये कशी असेल खेळपट्टी,हवामान आणि संभाव्य प्लेइंग 11

भाकरी बनवण्याच्या स्पर्धेत एका गटाला 5 भाकरी बनवणे अनिवार्य होते. यासाठी आवश्यक साहित्य मुलांनी घरून घेऊन येणे आवस्यक असते. प्रत्येक भाकरी ही आकाराने गोल आणि येग्य प्रमाणात भाजलेली असावी अशे काही साधे नियम होते. मुलांना ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मुलांना 2 तासाचा अवधी होता. यावेळी तीन विजयी क्रमांक काढण्यात आले. शिवाय प्रथम पारितोषिक म्हणून 501 रुपये. द्वितिय क्रमांकासाठी 309 तर तृतिय क्रमांकासाठी 201 रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले होते.

या उपक्रमातील दुसरी स्पर्धा कपडे धुण्याची होती. ऐकायला सोपे वाटत असलेल्या स्पर्धेत मुलांनीदेखील उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी मुलांना 2 बादल्या पाणी देण्यात आले होते. शिवाय केवळ 15 मिनिटात 3 ड्रेस स्वच्छ धुवून काढण्याचा नियम या स्पर्धेसाठी ठेवण्यात आला होता. या स्पर्धेत चौथीतील 16 तर पाचवीतील 19 मुलांनी सहभाग नोंदवला. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेच्या परीक्षक पदी गावातील स्थानिक महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेतून चिमुकल्यांना सोपे वाटत असलेल्या कामात किती अडचणी असतात आणि हे काम करत असताना कोणत्या शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागते याची जाणीव झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी