30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाAjinkya Rahane : मराठमोळ्या रहाणेची दिलेरी! चालू सामन्यात आपल्याच संघाच्या खेळाडूची केली...

Ajinkya Rahane : मराठमोळ्या रहाणेची दिलेरी! चालू सामन्यात आपल्याच संघाच्या खेळाडूची केली हकालपट्टी

कर्णधार अजिंक्य रहाणे याने चालू सामन्यात यशस्वी जयस्वालची मैदानातून हकालपट्टी केली. याघटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे आणि रहाणेच्या खेळभावनेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.

सध्या भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील नामांकित दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. भारतातील प्रतिष्ठित अशा दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एक अनपेक्षित घटना घडली आहे. ज्यामुळे पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला त्याच्याच संघातील युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याला फटकारून क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाबाहेर पाठवावे लागले. थोडक्यात सांगायचे तर कर्णधार अजिंक्य रहाणे याने चालू सामन्यात यशस्वी जयस्वालची मैदानातून हकालपट्टी केली. याघटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे आणि रहाणेच्या खेळभावनेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.

दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात कोईम्बतूर येथे झाला. या सामन्यादरम्यान असे काही घडले ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खरे तर, पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणे संघातील यशस्वी जैस्वालच्या कृत्याने इतका संतापला की त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले. वास्तविक दक्षिण विभागाचा संघ फलंदाजी करत होता. यादरम्यान फलंदाज रवी तेजा आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात काही बाचाबाची झाली. यशस्वी जैस्वाल सातत्याने फलंदाजांची स्लेजिंग करत होती आणि त्यासाठी त्याला पंचांनी ताकीदही दिली होती.

हे सुद्धा वाचा…

Monsoon Alert : बाबो! भारतात ‘या’ ठिकाणी पावसाचे थैमान; नागरिकांसाठी हाय अलर्ट

Mumbai Police : मुंबईच्या माजी आयुक्तांना सीबीआयकडून अटक, वाचा काय आहे प्रकरण

IND vs AUS T20I : सिरीज डिसाईडरमध्ये कशी असेल खेळपट्टी,हवामान आणि संभाव्य प्लेइंग 11

अजिंक्य रहाणेने यशस्वी जयस्वालला मैदानाबाहेर पाठवले

सामन्याच्या 50व्या षटकात यशस्वी जयस्वाल आणि रवी तेजा यांच्यातील वाद थोडा वाढला. याच कारणामुळे पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला मध्यस्थी करण्यासाठी पुढे यावे लागले. रहाणेने यशस्वी जयस्वालला शांत राहण्यासाठी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, यानंतरही यशस्वी जयस्वाल शांत झाला नाही आणि त्यानी बोलणे सुरूच ठेवले. यामुळे संतापलेल्या अजिंक्य रहाणेने त्याला मैदानाबाहेर पाठवले.

त्यानंतर 65व्या षटकात यशस्वी जयस्वालला क्षेत्ररक्षणासाठी बोलावण्यात आले. याआधी यशस्वी जयस्वालने या सामन्यात जबरदस्त द्विशतक झळकावले होते. त्याने 323 चेंडूत 263 धावा केल्या. त्यामुळे पश्चिम विभागाच्या संघाला 4 बाद 585 धावा करता आल्या. दक्षिण विभागाला 529 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते परंतु त्यांना केवळ 234 धावा करता आल्या आणि त्यांना 294 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यशस्वी जयस्वालला त्याच्या उत्कृष्ट द्विशतकाबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, परंतु त्याच्या या वृत्तीची खूप चर्चा झाली. आणि यावरून सध्या तो सोशल मिडीयावर ट्रोल होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी