33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeएज्युकेशनबारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल; मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल

बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल; मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या १२ वू परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातून एकुन 14,16,371 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी 12 वी परीक्षेत पास झाले आहेत. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकण टक्केवारी 91.25 टक्के एवढी आहे. तर राज्यात मुलींनी परीक्षेत बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींची टक्केवारी 93.73 इतकी टक्केवारी आहे. मुलांचे प्रमाण 89.14 टक्के इतके आहे. 12 वीचा ऑनलाईन निकाल mahresult.nic.in किंवा hscresult.mkcl.org अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

बारावीच्या निकालात यंदा कोकण विभाग अव्वल आहे कोकण विभागाचा निकाल 96.25 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल पुणे विभाग दुसऱ्या स्थानी असून पुणे विभागाचा निकाल 93.34 टक्के इतका आहे. तर तिसऱ्या स्थानावर कोल्हापूर विभाग असून 93.28 टक्के इतका निकाल कोल्हापूर विभागाचा लागला आहे. अमरावती विभागाचा निकाल 92.25 टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 91.85 टक्के लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 91.66 टक्के लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 90.37 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून 88.13 टक्के इतका मुंबई विभागाचा निकाल लागला आहे.

हे सुद्धा वाचा

आईचं कलेक्टर होण्याच स्वप्न अधुरे राहिले: मुलाने युपीएससीत मिळवले दमदार यश

कष्टाचे फळ लगेच मिळत नाही, झोपडपट्टीत राहुन मोहम्मद हुसेनने क्रॅक केली यूपीएससी

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत यश; पोलीस आयुक्तांनी केला सत्कार

असा पहा ऑनलाईन निकाल  


  • mahresult.nic.in किंवा hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट वर जा.

    HSC निकाल 2023 वर क्लिक करा.

    लॉगिन क्रेडेंशियल्स एंटर करा, म्हणजे तुमचा रोल नंबर, आईचे नाव वगैरे माहिती भरा.

    एकदा तुम्ही लॉग इन केल्यावर तुमचे गुण तपासा.

    विद्यार्थ्यांनी निकालाच्या पानाची प्रिंटआउटही घ्यावी असा सल्ला दिला जातो.
  • याशिवाय विद्यार्थी mahahsscboard.in, hscresult.mkcl.org आणि hsc.mahresults.org.in या वेबसाईटवर देखील बारावीचा निकाल पाहू शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी