30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईएकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद हवे होते

एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद हवे होते

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे हे भाजपच्या टार्गेटवर होते. हे अनेक घटनांमधून हे अधोरेखीत झाले आहे. त्याला कारण म्हणजे एकनाथ शिंदेंना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे होते. कारण शिवसेनेचे सरकार आले तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळणार याची आशा होती. परंतु पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळाले. त्यानंतर त्यांच्यात मनातील नाराजी आणखी घट्ट झाली. या विषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाईंनी आपले मत व्यक्त केले.

दुर्लक्षीत असलेले आमदार काहीच बोलायला तयार नव्हते. जे वंचित आहेत ते बोलायला तयार नाही. संजय राऊतांमुळे आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कधीच ईडीविषयी भाष्य केले नाही. तसेच ईडीमध्ये देखील त्यांच्याबाबत तक्रार करण्यात आलेली नाही. त्यांनी सत्ता आल्यावर भाजपवर कधी टीका केली नाही. समृध्दी महामार्ग पूर्ण करण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर ते पाहणी करण्यासाठी गेले होते. ते अनेकवेळा देवेंद्र फडणवीसांच्या सोबत होते. अनेकवेळा सभेत भाषण करण्यासही त्यांनी नकार दिला. त्यांचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती.

आनंद दिघे नंतर ठाण्याची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. नंतर त्यांनी ठाण्यातील संपर्क वाढवला. इतकेच नव्हे तर ठाण्याबाहेर देखील त्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले. मराठवाडा, विदर्भात त्यांनी चांगले संबंध वाढवले. उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदे समोर आम्ही नमणार नाही ही भूमिका यापूर्वी देखील घेतली होती. ते शिवसेनेचे गटनेते होते. सभागृहातील सर्व कामे सांभाळत होते.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचा निरोप घेतला असे सूचक ट्विट सुरुवातीला व्हायरल झाले. नारायण राणेंनी देखील एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी निर्णय घेतल्याचे म्हटले. संजय राऊतांमुळे अनेक आमदार नाराज आहेत. मात्र या नाराजी नाट्यात एक नवं ट्विस्ट आले. एकनाथ शिंदेंनी पुन्हा एक नवे ट्विट केले. ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आम्हाला आनंद दिघे साहेबांची शिकवण सत्तेसाठी प्रतरणा केली नाही. करणार नाही.’ असे लिहिले आहे.

हे सुद्धा वाचा :

भाजपचे नेते ‘बांधणी‘ करत होते; तेव्हा महाविकास आघाडीचे नेते ‘झोपा‘ काढत होते !

Super EXCLUSIVE : फुटलेल्या गटातील 22 आमदारांना मिळणार मंत्रीपदे, 36 आमदार फुटले !

शरद पवार म्हणाले, सरकार वाचवविण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची

EXCLUSIVE : शिवसेनेचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी