30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनवृक्षप्रेमी अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

वृक्षप्रेमी अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाल्याची घटना नुकतीच पुणे-बंगळुरु महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडे टोलनाका हद्दीत घडली. यावेळी सयाजी शिंदे यांना डोळ्याच्यावर आणि मानेला एक माशी चावली. यावेळी रस्ता रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीत बसवले.

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्यामुळे तासवडे टोलनाका हद्दीत वृक्ष पुर्नरोपणाचे काम सुरु आहे. या ठिकाणी आज सकाळी अभिनेते सयाजी शिंदे पोहचले. त्यांनी वृक्ष वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना वृक्षाच्या सभोवतालचे काम करण्यासाठी मार्गदर्शन करत होते. यावेळी मधमाशांनी शिंदे यांच्यासह तेथील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवले. यानंतर शिंदे यांनी गाडीत बसून एक व्हिडीओ तयार करून त्याद्वारे आपल्यावर मधमाशांचा हल्ला झाला असून आपण सुखरुप असल्याची माहिती माध्यमांना दिली.

ते म्हणाले, ‘मधमाश्यांनी आमच्यावर हल्ला केला. आता काळजीचं काही कारण नाही, मला दोन-तीन माश्या चावल्या असून कानाभोवती थोडी सूज आली आहे. मात्र आता आम्ही सुखरूप आहोत. चिंतेचं काहीच कारण नाही. या महामार्गावर वृक्षतोड सुरू आहे. या परिसरात सुमारे 200 वर्षांहून अधिक जुनी झाडे आहेत. त्यांची तोड केली जात आहे. ही झाडे तोडून त्यानंतर दोन-चार झाडे लावली जातात. परंतु त्याचा योग्यपद्धतीने पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे आताच पुढाकार घेऊन ही झाडे वाचवण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही इथं काम करत आहोत, असे सयाजी शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा : 

घरगुती हिंसाचाराप्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला थेट पाकिस्तानातून समर्थन

अभिनेता संदीप पाठकच्या ‘त्या’ गोष्टीने आजीचे डोळे पाणावले; लेकराची झाली आठवण

अभिनेता किरण मानेंची भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मराठी, हिन्दी आणि दाक्षिणात्य चित्रपट सीनेसृष्टीतला खलनायक ते खऱ्या जीवनातील नायक म्हणून आज अभिनेता सयाजी शिंदे यांच्याकडे पहिले जाते. आज 10 लाखांपेक्षा अधिक वृक्षरोपण करून जीवनसमृद्ध करणाऱ्या या मराठी माणसाने अभिनयाबरोबरच आपली वृक्षसंवर्धनाची गोडीही जपली. त्यांचे हे कार्य खरंच वाखाणण्याजोगे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी