33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनअभिनेता संदीप पाठकच्या 'त्या' गोष्टीने आजीचे डोळे पाणावले; लेकराची झाली आठवण

अभिनेता संदीप पाठकच्या ‘त्या’ गोष्टीने आजीचे डोळे पाणावले; लेकराची झाली आठवण

मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक (actor Sandeep Pathak) आपल्या कॉमेडी अभिनयामुळे देश-परदेशात ओळखला जातो. पण लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणारा हा दिलदार अभिनेता त्याहूनही कैकपटीने संवेदनशील असल्याचे दिसून येते. संदीप पाठक हा समाजमाध्यमांवर मनमोकळेपणे अभिव्यक्त होणारा अभिनेता आहे. कधी कामानिमित्त दौऱ्यावर असताना प्रवासातील अनेक अनुभव देखील तो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. (actor Sandeep Pathak giving a lift to an elderly woman in his car has A video gone viral)

असाच एक व्हिडीओ संदीपने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. शुटींगसाठी तो आपल्या कारमधून जात असताना रस्त्यात त्याला वाटसरु आजी (elderly woman) दिसते. तो आजीला आपल्या कारमध्ये लिप्ट देतो आणि थोडाकाळ झालेल्या या प्रवासात तो तिच्याशी हितगूज साधतो. या संवादात आजीच्या आणि त्याच्यात एक वेगळेच नाते निर्माण झालेले दिसून येते. खरे तर स्वत:तला माणूस जिवंत ठेवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून देखील तुम्ही एकमेकांसोबत काही क्षण माणूसकीच्या नात्याने घालवू शकता. काही क्षणांच्या या भेटी देखील माणूसकीचा पाझर जिवंत ठेवत असतात अशीच ही भेट म्हणावी लागेल.

संदीप पाठकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रवास करत असताना एका वाटसरू आजीसाठी तो गाडी थांबवतो आणि कुठे जायचं आहे म्हणून विचारतो. आजी शेलूला जायचं आहे असं सांगते. मग तो त्या आजीला आपल्या गाडीत बसायला सांगतो. त्यावेळी तुम्हाला एसटी नाही का ? असे संदीपने त्या आजीला विचारल्यानंतर ती नाही असे सांगते.

हे सुद्धा वाचा

अमृता खानविलकर म्हणते, ‘ललिता बाबर’चा चित्रपट हा माझा सर्वोच्च सन्मान

सिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, पुनर्जन्म मिळाला तर, तीच आई, तीच पत्नी, तीच मुले…

 

त्यानंतर प्रवासातून आजीला आपल्या इच्छितस्थळी सोडताना संदीप पाठक व्हिडीओव्दारे आपल्या चाहत्यांना सांगतो की, आता मी शुटींगसाठी जात होतो, आणि तिकडे मला रस्त्यात या आजी दिसल्या. आजींनी हात दाखविला म्हणून त्यांना मी कुठे जायचं आहे असं विचारलं तर त्यांनी शेलूला जायचं अस सांगितल्यानंतर मी त्यांना माझ्या गाडीत आजीला बसविले आणि मला आज असं वाटलं की गाडी घेतल्याचं चीझ झालं आज.

त्यावेळी आजी देखील अतिशय भावूक झाल्या त्यांच्या डोळयांच्या कडा ओलावल्या. आपले डोळे पदराने पूसत त्या म्हणाल्या अॅक्सीडेंट झाल्याचे सांगतात. त्यावेळी संदीप देखील सांगतो की, काहीवेळापूर्वी प्रवासात आजींनी सांगितले की, त्यांच्या मुलाचा अॅक्सीडेंट झाला. त्यावेळी तो आजीला म्हणतो की, मला मुलासारखच माना, आजी देखील मला आज मुलगा असल्यासारखेच वाटले. त्यावेळी तो दुख:चा आवंढा गिळणाऱ्या या आजींच्या पाठीवर आपूलकीचा हात ठेवत तो आजींना जेवला का, पाणी देऊ का प्यायला असे विचारतो. आजी नको असे म्हणत इथे बहीन आहे जवळच असे सांगत ओळख राहूदे बाबा म्हणते. यावेळी संदीपने आजींच्या वाकून पाया पडत आजीचे आशीर्वाद घेतल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी