24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeमनोरंजनअमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात, कोर्ट मॅरेज करत दिली माहिती

अमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात, कोर्ट मॅरेज करत दिली माहिती

मनोरंजन विश्वामध्ये अनेकदा नवनवीन घडामोडी घडत असतात. या घडामोडींविषयी चाहत्यांना माहिती जाणून घ्यायची असते. अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा अभिनेता अमिर खानची (Amir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) लग्नबंधनामध्ये अडकल्याच्या चर्चांना उधाण होतं. मात्र आज त्याबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे. आयरा आणि मराठमोळा नुपूर जयशिखरे (Nupur Shikhare) असं अमिर खानच्या जावयाचं नाव असून ते दोघंही आधी रीलेशनशीपमध्ये होते. याची चर्चा सर्विकडे होती. आज त्यांनी कोर्ट मॅरेज करत (Nupur Shikhare And Ira Khan) अधिकृतरीत्या चर्चेवर शिक्कमोर्तब केला आहे. ते १० जानेवारी दिवशी उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा करणार आहेत. आज कोर्ट मॅरेजसाठी अमिर खानचं सारं कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होतं.

आयरा आणि नुपूरने ताज लॅंड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये कोर्ट मॅरेज पद्धतीनं विवाह केला आहे. उदयपूरमध्ये नुपूर आणि आयरा यांचा १० जानेवारी दिवशी शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाहाची चर्चा आतापासून होऊ लागली आहे. अशातच ८ जानेवारीपासून या शाही विवाह सोहळ्याची तयारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. हा विवाह महाराष्ट्रीयन पद्धतीनं पार पडणार असून १३ जानेवारी दिवशी बॉलिवूडकर आणि मित्रमंडळींसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हे ही वाचा

‘या’ अभिनेत्रीची होणार झी मराठीच्या मालिकेत धमाकेदार एन्ट्री, प्रोमो झाले व्हायरल

टीम इंडिया संघाचा ‘एवढ्या’ मर्यादित चेंडूंमध्ये सामना निकालात, कसोटी सामन्यात केपटाऊनमधील पहिला विजय

श्रीदेवी प्रसन्न चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरची केमिस्ट्री

हाफ टी-शर्ट आणि हाफ पॅंटमध्येच नुपूर शिखरेनं उरकलं लग्न

नुपूर शिखरे हा मुळत: जिमट्रेनर आहे. जिम करत असताना तो तसाच आला आणि त्याने हाफ पॅंट आणि हाफ टी-शर्टवर कोर्ट मॅरेज केलं आहे. खरं तर हे आतापर्यंत आपण कधीच ऐकलं नसावं मात्र हे खरं आहे. यावेळी अमिर खानची मुलगी आयरा नटली होती. मात्र नुपूरने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. ढोलाच्या तालावर त्याने चांगलाच ठेका धरला असून त्याच्या नाचण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुपूर आणि आयरा गेली दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या अफेअरची चर्चा अनेकदा पाहायला आणि ऐकायला मिळाली. नुपूर शिखरे हा जिमट्रेनर असल्याने सर्वात प्रथम आयराची ओळख जिममध्ये झाली. अमिर खानला अनेकदा नुपूरने जिममध्ये ट्रेन केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी