33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीवर नेटिजन्सचा खुलासा

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीवर नेटिजन्सचा खुलासा

विरुष्का (Virushka) ही जोडी केवळ भारतात नाही तर जगभरात चर्चेत असते. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामगिरीने ठसा उमटवत आहेत. ही जोडी सोशल मीडियावर अधिक ट्रोल होत असल्याचे आत्तापर्यंत कधीच ऐकले नाही. मुळात ही जोडी सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार मोजक्याच गोष्टी शेअर करत असतात. मात्र चाहत्यांना या जोडीबाबत घडलेल्या घटना, घडलेल्या किस्स्यांची भनक लागते. विराट आणि अनुष्का (Virat kohli And Anushka) एकत्र असताना ते अनेकदा मध्यामांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र पापराजी अनेकदा त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपतात. यामुळे पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चांना उधाण येऊ लागते. मात्र आता विरूष्का हातात हात घालून एका हॉटेल बाहेर फिरताना दिसत आहेत. यावेळी अभिनेत्री अनुष्काने सैल ड्रेस घातला आहे. यामुळे याची चर्चा आता अनुष्काच्या प्रेग्नन्सीवर (Anushka Sharma Pregnancy) केली जात आहे.

मुंबई एअरपोर्टवर विरुष्का आणि त्यांची बेबी गर्ल एकदा स्पॉट झाली होती. यावेळी तिचे तोंड लपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला होता. त्यानंतर भारताच्या एका सामन्यावेळी विरुष्का यांची मुलगी स्पॉट झाली होती. तर आता विरुष्काच्या बेबीला आणखी एक भाऊ/बहीण येणार असल्याच्या चर्चा आहेत. याचा अंदाज एका सैल ड्रेसवरून लावण्यात आला आहे. एका हॉटेलच्या बाहेर विराट आणि अनुष्का फिरत आहेत. यावेळी तिने काळ्या रंगाचा सैल ड्रेस घातला आहे. एकदा ती सुरू असलेल्या वर्ल्डकप सामन्यातही पांढऱ्या रंगाचा सैल ड्रेस घालून आली होती. यावरून नेटकऱ्यांनी सैल ड्रेसचा संबंध प्रेग्नन्सीशी केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हे ही वाचा

धनत्रयोदशीला सोने का विकत घेतात? वाचा सविस्तर

बनावट रॉयल्टी बूक छापून डंपर लॉबीचा सरकारला ‘इतक्या’ कोटींचा चुना

शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ होणार; एकनाथ शिंदे मुंबईकरांना दिवाळी भेट

विरुष्का हॉटेल बाहेर फिरत असताना माध्यमांनी त्यांना स्पॉट केले आहे. महिला गर्भवती असल्याने त्यांचे पोट दिसते. ते पोट लपविण्यासाठी ते ढगळे कपडे घालतात. जेणेकरून ते पोट आणि बेंबी दिसत नाही. यावेळी ही अनुष्काने आपले पोट झाकण्यासाठी सैल ड्रेस घातला आहे. यावरून नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी

विराट आणि अनुष्का दोघेही फिरत असतानाचा व्हिडीओ विरल भयानी (Viral Bhayani) या इन्स्टा आयडीवरून व्हायरल करण्यात आला आहे. यावर आता नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी ‘शंभर टक्के प्रेग्नेंट’ अशी कमेंट केली. तर एकाने ‘बाळ होणार का’? अशी कमेंट करून सवाल केला आहे. एका नेटिजन्सने दुसरा विराट लवकरच येण्याच्या मार्गावर आहे. अशी कमेंट करत चाहते विरुष्काच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी उत्सुक असून त्यांनी विरुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी