29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमनोरंजनभूमीचा फिमेल ऑरगॅजमवर भाष्य करणारा चित्रपट चालला टोरंटोला

भूमीचा फिमेल ऑरगॅजमवर भाष्य करणारा चित्रपट चालला टोरंटोला

अभिनेत्री भूमी पेडणेकरचा फिमेल ओर्गेजमवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची अमेरिकेतल्या टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे. महिलांच्या ऑरगॅजमवर (कामतृप्ती) हा चित्रपट आहे. या चित्रपटामुळे सेक्स्युअल लाईफवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अनेकांना ऑरगॅजमबद्दल माहिती नसते, किंवा त्याबद्दल बोलायचे नसते. भारतात चित्रपटानिमित्ताने हा विषय चर्चेत आला आहे. टोरंटो चित्रपटात स्क्रिनिंग मिळवणारा हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.
सेक्स्यूअल लाईफमध्ये ऑरगॅजमला अत्यंत महत्त्व आहे. पण नेमके त्याच बाबतील अनेकांना पुरेशी माहिती नसल्याने निराशा येते. आपल्याकडे पुरुष सेक्सचा आनंद घेतात, मात्र आपला जोडीदाराला आपण सुख देऊ शकलो का? याचा विचार फारसा केला जात नाही. त्यामुळे दोघांनाही ऑरगॅजमबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.ऑरगॅजम म्हणजे थोडक्यात परमोच्च सुख. आपल्या जोडीदाराला आनंद मिळवून देण्यासाठी काय करायला हवे याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या समाजात अनेक महिलांना ऑरगॅजम मिळवून देण्यात पुरुषांना स्वारस्य नसते, किंवा त्यांना त्याबद्दल फारशी माहिती नसते. तसेच महिलांना देखील त्याबद्दल खुल्यापणाने बोलता येत नाही, किंवा त्या आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. त्यामुळे अनेक जोडीदारांच्या लैंगिक आयुष्यात ते खुश नसतात. याबद्दलचं सानिका कपूरचे पात्र साकारणाऱ्या भूमी पेडणेकरचा चित्रपट आधारलेला आहे.
सानिका दिल्लीत राहणारी उच्च पदस्थ मुलगी आहे. लहानपणापासून मुलांविषयीच्या आकर्षणाने तिचं शाळेतच प्रेमप्रकरण घडतं. त्यानंतरही तिची प्रेमप्रकरणे सुरूच राहतात. प्रियकराशी शारीरिक संबंध येऊनही तिला कामोत्तेजन सुख (ओर्गेजम) मिळत नाही. सानिकाचं लग्न ठरतं. पण पार्टीतील ‘त्या’ रात्री आपले संबंध होणाऱ्या नवऱ्यासोबत आले की भलत्यासोबत हे नशेतील सानिकाला आठवत नाही. पहिल्यांदा कामोत्तेजन मिळालं पण नेमकं कोणाकडून, या गोंधळावर चित्रपट फिरतो.
हे ही वाचा 
या बॉल्ड विषयावर सोनम कपूरची बहीण आणि अनिल कपूरची मुलगी रिया कपूरनं सिनेमा बनवला आहे. चित्रपटात भूमी सोबत कुश कपाडिया आणि शेहनाज गिलच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी