33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमनोरंजनSonali Phogat Death : भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसात...

Sonali Phogat Death : भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसात गुन्हा दाखल

भाजपच्या नेत्या राहिलेल्या आणि टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली फोगट यांचा गोव्यात मृत्यू झाला. सोनाली फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटका आल्याने झाल्याचे सांगण्यात आलेले असतानाच सोनाली फोगट यांचा भाऊ रिंकू ढाका याने सोनाली फोगट हिची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

भाजपच्या नेत्या राहिलेल्या आणि टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली फोगट यांचा काल (ता. 23 ऑगस्ट) गोव्यात मृत्यू झाला. सोनाली फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटका आल्याने झाल्याचे सांगण्यात आलेले असतानाच सोनाली फोगट यांचा भाऊ रिंकू ढाका याने सोनाली फोगट हिची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. यामुळे आता रिंकू ढाका याने पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्यामध्ये सोनाली फोगट यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना गोव्यातील सेंट अँथोनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे सोनाली फोगट यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. ज्यामुळे पोलिसांकडून सोनाली फोगट यांच्या मृत्यूची नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.

सोनाली फोगट यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनालीच्या दोन सहकाऱ्यांनीच तिची हत्या केली आहे असा आरोप सोनाली फोगट हिच्या भावाकडून करण्यात आला. त्यामुळे जेव्हा गोवा पोलिसांकडून तिच्यासोबत त्यावेळी असलेल्या दोन सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, तेव्हाच कुटुंब पोस्टमार्टम करण्याची परवानगी देईल, असेही रिंकू ढाका यांच्याकडून पोलिसांना सांगण्यात आले.

दरम्यान, सोनाली फोगट हिने मृत्यू होण्याच्या आधल्या रात्री तिच्या आईला आणि बहिणीला कॉल केला होता. यावेळी सोनाली प्रचंड घाबरलेली होती. यावेळी तिने तिच्यासोबत असलेल्या दोन सहकाऱ्यांची आपल्या घरच्यांकडे तक्रार देखील केली होती, अशी माहिती रिंकू ढाका यांच्याकडून पोलिसांना देण्यात आली. इतकेच नाही तर, सोनाली फोगट हिच्या मृत्यूनंतर तिच्या हरियाणा येथील फार्महाऊसचे सीसीटीव्ही कॅमेरे, लॅपटॉप आणि इतर महत्वाच्या वस्तू देखील गायब झाल्या आहेत, असे रिंकू ढाका यांच्याकडून तक्रारीत सांगण्यात आले आहे. रिंकू ढाका याने आणखी दिलेल्या माहितीमध्ये सोनाली फोगट यांच्या सहकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी देखील तिच्या जेवणात काहीतरी मिसळले होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल देखील केले होते, असे सांगितले.

हे सुद्धा वाचा

Sonali Phogat : भाजपच्या टिकटॉक स्टार नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू

Sawan Kumar Tak Passes Away : बाॅलिवूडला धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन

Raju Srivastav : 15 दिवसानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत झाली सुधारणा

सोनाली फोगट या टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच त्यांनी २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावरून निवडणूक देखील लढवली होती. त्या कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकलेल्या पाहायला मिळाल्या. तसेच बिग बॉस हिंदीच्या १४ व्या पर्वात सुद्धा त्या अभिनेता अली गोनी याच्यासोबत नाव जोडल्यामुळे चर्चेत आल्या होत्या.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी