31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमनोरंजनचेन्नईत मिचाँग चक्रीवादळाने पूर; जिकडं तिकडं पाणीच पाणी

चेन्नईत मिचाँग चक्रीवादळाने पूर; जिकडं तिकडं पाणीच पाणी

चेन्नईत काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर मिचाँग या चक्रीवादळाने अनेकांचे जीव घेतले आहे. जिकडं तिकडं पाणीच पाणी पहायला मिळत असून पुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू मिळवणं अवघड होऊन बसलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून चेन्नईत भयावह परिस्थिती निर्माण होत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांच्या गाड्या देखील वाहून गेल्या आहेत. एवढंच नाही तर आता याचा फटका बॉलिवूड अभिनेता आमिर खानला पडला आहे. २४ तासानंतर आमिर खानला बचाव मोहीम पथकाने पूरजन्य परिस्थितीतून बाहेर काढले.

पूर्ण १ दिवस आमिर खान चेन्नईच्या पूरामध्ये अडकून बसला होता. यावेळी बचाव पथक आणि अग्निशमन दलाने त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते. हे फोटो विरल भयानी या इंस्टाग्राम पेजरवर शेअर करण्यात आले आहेत. अशातच २०० टेबल टेनिसपटू देखील या पुरात अडकले होते. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ११ वर्षांखालील टेनिस स्पर्धेत मानांकन पटकावले ही एक आनंदाची बाजू होती. मात्र त्यांना या पुरामुळे दुखाचाही सामना करावा लागला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हे ही वाचा

‘विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती द्यावी’

‘शासन आपल्या दारीचे महत्त्व घरात बसलेल्यांना काय कळणार’?

विराटच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलीने सोडलं मौन

दरम्यान, दक्षिण बंगालमध्ये मिचाँग चक्रीवादळ आल्याने सतत पाऊस पडत आहे. यामुळे वीज पुरवठा खंडित केला आहे. इंटरनेट सेवाही बंद आहेत. यामुळे नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढू लागल्या आहेत. मंगळवारी या चक्रीवादळात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक फटका हा तामिळनाडूमधील चेन्नईला बसला आहे. १०० हून अधिक ट्रेन त्याचप्रमाणे १०० हून अधिक विमानांची सेवा बंद करण्यात आली आहे. या वादळाने ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये नैसर्गिक आपत्ती आली. यामुळे पुराचा सामना करावा लागत असून पिकांची नासाडी झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी